शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
4
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
5
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
6
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
7
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
8
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
9
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
10
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
11
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
12
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
13
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
14
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
15
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
16
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
17
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
18
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
19
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
20
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

३,८४१ जणांकडून नोटाचा वापर

By admin | Updated: October 21, 2014 23:38 IST

विधानसभा निवडणूक : सर्वाधिक सावंतवाडी मतदारसंघात

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती आणि आघाडी तुटल्याने मतदारांना यंदा उमेदवारांचे एकापेक्षा अनेक पर्याय उपलब्ध होते. तरीदेखील यापैकी कोणताही उमेदवार आमच्या दृष्टीस पात्र नसल्याचा निष्कर्ष काढून जिल्ह्यातील तब्बल ३ हजार ८४१ मतदारांनी ‘नन आॅफ द अबोव्ह’चा (नोटा) अधिकार वापरला आहे. नोटाचे मतदान होणारी विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. या अगोदर गेल्या लोकसभेला ‘नोटा’ हा पर्याय होता. १९ आॅक्टोबरला नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीच्या निकालानंतर नोटाचा सर्वाधिक वापर हा सावंतवाडी मतदारसंघात तर दुसऱ्या स्थानावर कणकवली मतदारसंघात नोटाचा वापर करण्यात आला आहे तर तिसऱ्या स्थानावर कुडाळ विधानसभेचा क्रमांक लागतो.निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार मान्य नसेल तर अनेक मतदार गेल्यावर्षापर्यंत मतदान न करण्याचा पर्याय निवडत होते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच मतदानाच्या यंत्रावर ‘नोटा’च्या स्वतंत्र बटणाचा समावेश झाला. नोटा पर्याय असलेली लोकसभा ही पहिलीच निवडणूक ठरली होती. त्यानंतर आता विधानसभेत या ‘नोटा’ पर्यायाचा वापर करण्यात आला होता.कणकवली विधानसभा मतदारसंघात कणकवली, देवगड व वैभववाडी हे तालुके येत असून त्यामध्ये १ लाख ५५ हजार ५३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यातील १३८१ मतदारांनी नोटा हा पर्याय निवडला. कुडाळ विधानसभा मतदारसंघात कुडाळ व मालवण हे दोन तालुके येतात. यामध्ये १ लाख ४० हजार ४५८ मतदारांनी मतदान केले होते. त्यातील ९४९ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग हे तीन तालुके येतात. या तीन तालुक्यातून १ लाख ४५ हजार ३४८ मतदारांनी मतदान केले होते. त्यातील १५११ मतदारांनी नोटा पर्याय निवडला. असे जिल्ह्यात एकूण ४ लाख ४१ हजार ३४४ एवढे मतदान झाले होते. त्यातील तब्बल ३ हजार ८४१ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती व आघाडी संपुष्टात आल्याने उमेदवारांची संख्या कमालीची वाढली होती. वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र कुणालाच मत न देता गप्प राहण्यापेक्षा ‘नोटा’ बटण दाबणेच मतदारांनी पसंत केले. त्यामुळे जिल्ह्यात ३ हजार ८४१ मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबले.मतदारांकडून नोटाचा वापर...मतदारसंघएकूण मतदान नोटा मतेकणकवली१,५५,५३८१३८१कुडाळ१,४०,४५८९४९सावंतवाडी१,४५,३४८१५११एकूण४,४१,३४४३८४१