शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

रोग नियंत्रणासाठी आयुर्वेदचा वापर करा

By admin | Updated: February 18, 2015 00:45 IST

माधवी शेट-तानावडे : तळकट येथे आरोग्य शिबिर

कसई दोडामार्ग : आयुर्वेदाचा पाया, आपले वातावरण, वनौषधी, जीवनशैली, बदलते ऋतुमान यांच्या पक्क्या पायावर आधारीत आहे. त्यामुळे रोगप्रतिबंधक म्हणून किंवा रोगनियंत्रणासाठी सुद्धा आयुर्वेदाचा आधार घेण्याचे आवाहन पणजी येथील माधवबाग आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या प्रमुख डॉ. माधवी शेट -तानावडे यांनी तळकट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित मोफत आरोग्य शिबिरात बोलताना केले. तळकट विभागात कार्यरत संकल्प प्रतिष्ठान बांदा येथील अचल आॅर्गेनिक काजू कंपनी व माधवबाग पणजी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन १५ रोजी करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी सचिन काणेकर, संजय गवस, शिरीषकुमार नाईक, राजेश देसाई, तळकट सरपंच रमेश शिंदे, झोळंबे सरपंच अमृता मेस्त्री, उपसरपंच संजय वेटे, डॉ. गोविंद देसाई, माधवबागचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपा नाईक, डॉ. स्वाती पांढरे, पंचकर्म चिकित्सक गौरव कुडाळकर, संगीता कांबळे, अपर्णा कुडतरकर, गणेश नांगरे, नाना देसाई, माजी सरपंच सुनेत्रा नांगरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. तानावडे यांनी आयुर्वेदाचे महत्त्व उपस्थितांसमोर विषद केले. त्यानंतर आहारविषयक मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, आपल्या आजाराचे मूळ कारण हे आपल्या सदोष आहारातच असते. अशा शिबिरांचा लाभ घ्यावा व आरोग्य चांगले राखावे, असे आवाहन एकनाथ नाडकर्णी यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच इसीजी व रक्ततपासणीही करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या शिबिराचा तळकट परिसरातील रुग्णांनी लाभ घेतला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विनायक गाडगीळ यांनी केले. (वार्ताहर)