शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कुडाळ नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे उपोषण, आश्वासनाअंती उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 20:12 IST

कुडाळ नगरपंचायतीच्या प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी एमआयडीसीमध्ये मंजूर झालेली जागा नगरपंचायतीच्या ताब्यात मिळावी व या जागेवरील स्थगिती आदेश रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी छेडलेले उपोषण एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाअंती गुरूवारी रात्री तब्बल ११ तासांनी मागे घेण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा १५ जूनला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नगराध्यक्ष ओंकार तेली व नगरसेवकांनी दिला आहे.

ठळक मुद्देकुडाळ नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे उपोषण, अधिकाऱ्यांच्या आश्वासनाअंती उपोषण मागेघनकचरा प्रकल्पासाठीची जागा नगरपंचायतीच्या ताब्यात देण्याची मागणी

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी एमआयडीसीमध्ये मंजूर झालेली जागा नगरपंचायतीच्या ताब्यात मिळावी व या जागेवरील स्थगिती आदेश रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी छेडलेले उपोषण एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाअंती गुरूवारी रात्री तब्बल ११ तासांनी मागे घेण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा १५ जूनला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नगराध्यक्ष ओंकार तेली व नगरसेवकांनी दिला आहे.कुडाळ शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पासाठी कुडाळ एमआयडीसी येथे जागा उपलब्ध व्हावी, या मागणीसाठी कुडाळ नगरपंचायतीने एमआयडीसी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र, रत्नागिरी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी यांनी स्थानिक लोकांच्या विरोधाचे कारण देत या प्रकल्पाच्या जागेसाठी स्थगिती आदेशाचे लेखी पत्र नगरपंचायतीला पाठविले होते. त्यामुळे या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.एमआयडीसी प्रशासनाच्या या स्थगिती निर्णयाविरुद्ध नगराध्यक्ष ओंकार तेली, उपनगराध्यक्ष सायली मांजरेकर, सभापती सरोज जाधव, साक्षी सावंत, अश्विनी गावडे, नगरसेवक एजाज नाईक, अनंत धडाम, सुनील बांदेकर, राकेश कांदे व काही नागरिकांनी कुडाळ एमआयडीसी कार्यालयासमोर गुरूवारी सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.उपोषण सुरू केल्यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी दिवसभरात तीन ते चार वेळा चर्चा करून उपोषण मागे घेण्यास सांगितले. मात्र, जोपर्यंत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पच्या जागेसाठी देण्यात आलेला स्थगिती आदेश रद्द केला जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. तसेच या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईत नको, तर कुडाळ येथेच बैठक आयोजित करावी, अशी भूमिका नगराध्यक्ष तेली यांनी घेतली. त्यामुळे हे उपोषण रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. मात्र, अधिकाºयांकडून योग्य निर्णय देण्यास उशीर होत होता.अखेर गुरूवारी रात्री ११ तासांनी कुडाळ एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी व तोडगा काढण्यासाठी कुडाळ येथे १४ जून रोजी बैठक आयोजित करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.या उपोषणाला कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी तसेच नाभिक संघटना, कुडाळ सुधार समिती, मनसे, भैरववाडी मित्रमंडळ, हिंदू कॉलनी मित्रमंडळ, कुडाळ व्यापारी वर्ग यांनी पाठिंबा दिला.सरोज जाधव यांची तब्येत खालावलीया दरम्यान गुरूवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उपोषणकर्त्या बांधकाम सभापती सरोज जाधव यांची तब्येत खालावली. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर बोलावण्यात आले. मात्र, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपचार करून घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर या आंदोलनाने अधिक तीव्र रूप धारण केले.08062019-ङंल्ल‘-03कुडाळ नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या उपोषणादरम्यान सरोज जाधव यांची तब्येत खालावली. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाºयांकरवी उपचार करण्यात आले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग