शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचे काम प्रगतीपथावर, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 27, 2023 14:35 IST

युवा मतदारांची नोंदणी निराशाजनक

सिंधुदुर्ग : लोकशाही सक्षमीकरणासाठी पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुध्दीकरण यासाठी  भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवला जातो. हा कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर, २०२३ या कालावधीत राबवला जाणार आहे. या कालावधीत आक्षेप किंवा हरकती घेता येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली.जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यासाठी विशेष शिबिरे आयोजित केलेली आहेत. दिव्यांगासाठी कार्य करणा-या सामाजिक संस्थांच्या मदतीने दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने जिल्हयात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. ०५ जानेवारी, २०२३ च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदार संख्या ६,७२, ७७६ इतकी होती. निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेत मतदार नोंदणी, नाव वगळणी या बाबी सुरूच होत्या. आज रोजी एकूण मतदार संख्या ६,६९,५९८ इतकी असून त्यामध्ये पुरुष मतदार ३,३३,९८७ व स्त्री मतदार ३,३५,६११ व स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण १००५ इतका आहे. जिल्हयाच्या लोकसंख्येत १८ - १९ वयोगटाची टक्केवारी ३.४४ इतकी आहे. पण ऑक्टोबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी १.०५ एवढी आहे. ही आकडेवारी निराशाजनक आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVotingमतदानcollectorजिल्हाधिकारी