शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपरकर यांना पक्षाकडून सक्तीची निवृत्ती देण्यात आली, मनसे नेत्यांकडून टीकास्त्र

By अनंत खं.जाधव | Updated: February 11, 2024 16:49 IST

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका केली  त्यांना मनसेकडून सक्तीची निवृत्ती  देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी : आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा निवडणुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसे स्वबळावर निवडणूका लढविणार आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. संघटना नवीन असली तरी पक्ष जूना आहे.त्यामुळे लोक आम्हाला नक्कीच स्वीकारतील, असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे व संदिप दळवी यांनी  व्यक्त केला.ते रविवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका केली  त्यांना मनसेकडून सक्तीची निवृत्ती  देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

राणे म्हणाले, एरव्ही माहिती अधिकार कायद्याचा पुरेपूर वापर करण्यात  माहीर असलेल्या उपरकर यांना राजीनामा देण्यास उशीर का लागला? आमच्यामुळे कोणी पक्ष सोडला असे सांगत असेल तर गेली दोन ते अडीच वर्षे ते आजारपणाचे कारण सांगून पक्षापासून दूर होते. असे आपणच सांगतात गेल्या दहा वर्षात त्यांनी खरंच पक्ष वाढवला का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेची जबाबदारी परशुराम उपरकर यांच्याकडे होती. परंतु या काळात त्यांनी पक्ष वाढवण्याचे कोणतेही काम केले नाही. उलट आपल्या भोवती पक्ष झुलता ठेवला. त्यामुळे त्याचा फटका पक्षाला बसला. नेहमी आजाराचे कारण सांगून ते पक्ष नेतृत्वापासून आणि पक्षाच्या कामापासून दूर राहिले. उलट त्यांनी संघटना वाढीसाठी कोणताही प्रयत्न केला नाही. त्यामुळे पक्षात दोन गट पडले. यावेळी आम्ही वारंवार त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पक्ष नेतृत्वासह आम्हाला वेळोवेळी टाळले. दुसरीकडे आम्ही जिल्ह्यातून गेल्यानंतर एखादे आंदोलन मोर्चा करू असे इशारा देऊन त्यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी संघटनेचे काम सुरू ठेवले  त्यामुळे हा सर्व प्रकार नेतृत्वाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना दूर करण्यात आले. असेही गजानन राणे व संदिप दळवी म्हणाले. उपरकर हे जेष्ठ आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात वक्तव्य करणार नाही. परंतु माहिती अधिकार कायद्याचा वापर करतना तत्पर असलेल्या उपरकर यांना राजीनामा देण्यास वेळ का लागला? असा खोचक सवाल करीत उपरकर मनसे सोबत नसले तरी जुने पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांना आम्ही नक्कीच पक्षात सामावून घेणार आहोत, असे त्यांनी  सांगितले. यावेळी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, जिल्हाअध्यक्ष अनिल केसरकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, बाळा पावसकर, सुधीर राऊळ, कुणाल किनळेकर, गुरुदास गवंडे, सचिन सावंत आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग