शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी न देण्याचा एकमुखी ठराव

By admin | Updated: July 10, 2014 00:10 IST

कासार्डे ग्रामस्थांची बैठक : एमआयडीसी प्रकल्पाला विरोध

नांदगांव : कासार्डे येथील नियोजित एमआयडीसी प्रकल्पासाठी कासार्डेसह अन्य चार महसुली गावांमध्ये भूसंपादनासाठी भूधारकांना नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरु करण्यात आली. मात्र कासार्डेतील एकाही भूधारकाने नोटीस न स्वीकारता बुधवारी ग्रामस्थांनी सभा बोलावली. त्यामध्ये या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवित जमिनी देणार तर नाहीच शिवाय नोटीसाही स्वीकारू नयेत असे ठरविण्यात आले. यावेळी हंगामी समिती नेमण्यात येवून १२ जुलैला पुन्हा सभा होईल. त्या सभेत पुढील दिशा स्पष्ट होईल. मात्र या प्रकल्पाला सुरुवातीपासून तीव्र विरोध आहे.कासार्डे येथील नियोजित एमआयडीसी प्रकल्पासाठी एकूण २३०० हेक्टरपैकी पहिल्या टप्प्यातील कासार्डे, जांभूळगाव, दाबगाव, उत्तर-दक्षिण गावठण व नाग सावंतवाडी या पाच महसुली गावांतील एकूण १७०० हेक्टर जमिनीचे संपादनाची प्रक्रिया महसूल विभागाकडून सुरु करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील एकूण १० हजार नोटीसांचे वितरण करण्यात आले. मात्र, कासार्डेतील एकाही ग्रामस्थाने नोटीस न स्वीकारता या प्रकल्पाला विरोध असल्याचे दर्शविले. बुधवारी सकाळी महालक्ष्मी मंदिरात आयोजित केलेल्या सभेसाठी संघर्ष समिती अध्यक्ष श्रीपत पाताडे, सरपंच संतोष पारकर, पंचायत समिती सदस्य संजय देसाई यांची अनुपस्थिती दिसून आली. यावेळी ग्रामस्थांनी नोटीसा न स्वीकारता आपल्या जमिनी या प्रकल्पासाठी देऊ नयेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला तरीदेखील ग्रामस्थांनी तयार असल्याचे ठरविण्यात आले. तसेच यावेळी हंगामी समिती नेमण्यात आली.एका पक्षाच्या बाजूने लोकआजच्या कासार्डे ग्रामस्थांच्या सभेबाबत संघर्ष समिती अध्यक्ष श्रीपत पाताडे यांना विचारले असता ते म्हणाले की, आपल्याला आजच्या सभेबाबत माहितीच नसून कोणी सांगितलेही नाही. मात्र, आम्ही गावासोबत आहोत असे सांगतानाच एका पक्षाच्या बाजूनेच लोक होते, असेही पाताडे यांनी सांगितले.दरम्यान, आजच्या सभेला ९० लोक उपस्थित राहिले होते. त्यात या प्रकल्पाविरोधात संघर्ष करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तर १२ जुलैला सकाळी ११.३० वाजता महालक्ष्मी मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील इतर प्रकल्पांबाबतची सद्यस्थिती, या प्रकल्पाविरोधात पुढील ध्येय धोरणे तसेच इतर कायदेशीर कारवाईबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.याबाबत कासार्डे तलाठी जाधव यांना पुढील कारवाईबाबत विचारले असता ते म्हणाले की, वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल. कासार्डे येथील नियोजित एमआयडीसी प्रकल्पाबाबत पाच महसुली गावातील एक प्रतिनिधी याप्रमाणे डॉ. अरविंद कुडतरकर (दाबगाव), श्रीरंग पाताडे (द. गावठण), डॉ. संतोष राणे (धारेश्वर कासार्डे), सदानंद सावंत (धारेश्वर), दशरथ सावंत (नागसावंतवाडी), बाळाराम तानवडे (जांभूळगाव) यांची नेमणूक करण्यात आली. या दोन दिवसांत प्रत्येक वाडीची सभा होऊन त्यानंतर १२ जुलैच्या सभेत अंतिम संघर्ष समिती तयार करण्यात येईल असे आजच्या सभेत ठरविण्यात आले. (वार्ताहर)