शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

समुद्र किनारपट्टीवर भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात येणार, मंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती

By अनंत खं.जाधव | Updated: May 28, 2024 16:13 IST

सावंतवाडी कणकवली शहरात ही लवकरच भूमिगत विद्युत वाहिन्या

सावंतवाडी : राज्य सरकार समुद्र किनारपट्टीवर ९०० कोटी खर्च करून भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली. तसेच  कणकवली व सावंतवाडी शहरांमध्ये भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी आचारसंहिता शिथिल झाल्यावर त्याबाबतचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मंत्री केसरकर म्हणाले, अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे त्यांना भरपाई मिळेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यास सहकार्य करावे. आचारसंहितेनंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल त्यात हा निर्णय घेतला जाईल. दोडामार्ग तालुक्यातील महालक्ष्मी कंपनीच्या वीज वितरणासाठी लाईन टाकताना शेतकऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे असे आवाहन ही त्यांनी केले.सावंतवाडी शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी मंजुरी मिळाली होती. त्यासाठी निधीही मंजूर झाला होता. मात्र तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर असताना ते काम केले नाही तेच आता बोलत आहेत, अशी टिका साळगावकर यांचे नाव न घेता केसरकर यांनी केली. मात्र आचारसंहितेनंतर सावंतवाडी व कणकवली शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी प्रस्ताव तयार केले जाईल व शासनाला तो सादर करून मजुरी मिळवू असेही ते म्हणाले. भगवतगीता पाठ, मनुस्मृतीबाबत चुकीच्या चर्चा भगवतगीता पाठ, मनुस्मृती बाबतीत चुकीच्या चर्चा सुरू आहेत. शासनाकडून मंजुरी देण्यात आली नाही. समितीने प्रस्ताव सादर केला तो फुटला आणि चर्चा सुरू झाली आहे. खरे तर स्पर्धा परीक्षा, सीबीएससीमध्ये हे पाठ, श्लोक आहेत. विद्यार्थ्यांच्या चांगल्यासाठी पाठ, श्लोक ठेवला आहे त्याबद्दल प्रत्येकाने खातरजमा करून घ्यावी, ती प्रस्तावना आहे असेही केसरकर यांनी सांगितले.वीज वितरण बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कोकणामध्ये अतिवृष्टी होते असलेल्या ठिकाणी  पावसाळ्यात वीज वितरण कंपनीला पायाभूत सुविधांची गरज आहे. पायाभूत सुविधा देताना कोकणासाठी वीज वितरण कंपनीला कर्मचाऱ्यांची गरज आहे. ही त्याच्या निदर्शनास आणून देण्यात येईल असे केसरकर यांनी स्पष्ट केले. वीज वितरणचे काम सुरळीतपणे व्हावे आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन हा प्रश्न सोडविण्यात येईल असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSea Routeसागरी महामार्गDeepak Kesarkarदीपक केसरकर