शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात; संवाद यात्रेला संबोधित करणार

By अनंत खं.जाधव | Updated: February 4, 2024 12:13 IST

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे महाराष्ट्रात घडलेल्या सत्तांतर नाटकानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत त्यांचा हा दौरा सावंतवाडीतून सुरू होणार आहे.

सावंतवाडी : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उध्दव ठाकरे हे महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर रविवारी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्याने शिवसेना ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.थोड्याच वेळात उध्दव ठाकरे गोवा मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यांचे प्रथम महाविकास आघाडीच्या वतीने बांदा येथे तर शिवसेना सावंतवाडी तालुक्याच्या वतीने सावंतवाडी येथे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते सावंतवाडीतील गांधी चौक येथे संवाद यात्रेला संबोधित करतील  दरम्यान या संभास्थळाची सकाळीच खासदार विनायक राऊत यांनी पाहाणी केली.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे महाराष्ट्रात घडलेल्या सत्तांतर नाटकानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत त्यांचा हा दौरा सावंतवाडीतून सुरू होणार आहे. उध्दव ठाकरे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गोवा येथील मोपा विमानतळावर दाखल होणार असून साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते सावंतवाडीत दाखल होतील त्याच्या सोबत रश्मी ठाकरे तसेच तेजस ठाकरे ही असणार आहेत.उध्दव ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

उध्दव ठाकरे हे सावंतवाडीत दाखल झाल्यानंतर प्रथम त्याचे येथील जनरल जगन्नाथराव भोसले उद्याना समोर सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.या स्वागतासाठी खास क्रेन मागविण्यात आली असून क्रेन मधून उध्दव ठाकरे यांना हार घालण्यात येणार आहे.या स्वागता नंतर ठाकरे हे येथील गांधी चौकात संवाद यात्रेच्या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.उध्दव ठाकरे यांच्या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन खासदार विनायक राऊत यांच्याकडे असल्याने ते या मध्ये जातीने लक्ष घालत असून शनिवारी रात्री उशिरा त्यांनी सभास्थळाची पाहाणी केली त्यानंतर पुन्हा एकदा रविवारी सकाळी सभास्थळी जाऊन पाहाणी करत समाधान व्यक्त होत केले.ठाकरे मंत्री केसरकारांवर काय बोलणार याकडे लक्ष महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर प्रथमच उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत या सत्तांतर नाट्यात एकनाथ शिंदे यांना साथ दिलेल्या मंत्री दीपक केसरकर यांच्या होमपीचवर ठाकरे येत असल्याने केसरकर यांच्यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे