शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सीआरझेडबाबतच्या जमिनीचे सर्व्हे नंबर जाहीर करणार- उदय चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : मालवण व आचरा परिसरातील ज्या जमिनी सी व्ही सी ए (क्रिटीकली व्हलनरेबल सीआरझेड एरिया)मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत, त्या जमिनींचे सर्व्हे नंबर येत्या दोन दिवसांत वेबसाईटद्वारा जाहीर केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर ५ आॅक्टोबरपर्यंत हरकतीही मागविण्यात येणार आहेत.सागरी अधिनियमन ...

ठळक मुद्दे ५ आॅक्टोबरपर्यंत हरकतींसाठी मुदतजैव विविधता टिकण्यासाठी आवश्यक असलेली विविध संवेदनक्षम ठिकाणे यांचा समावेशमाहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : मालवण व आचरा परिसरातील ज्या जमिनी सी व्ही सी ए (क्रिटीकली व्हलनरेबल सीआरझेड एरिया)मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत, त्या जमिनींचे सर्व्हे नंबर येत्या दोन दिवसांत वेबसाईटद्वारा जाहीर केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर ५ आॅक्टोबरपर्यंत हरकतीही मागविण्यात येणार आहेत.

सागरी अधिनियमन क्षेत्र २०११ च्या परिपत्रकानुसार मालवण व आचरा या परिसरातील सीआरझेड अंतर्गत येणारे नकाशे जाहीर करण्यात आले होते. त्यावर नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर सागरी अधिनियम संवेदनक्षम क्षेत्रात येणाºया जमिनींचे सर्व्हे नंबर येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहेत. यामध्ये सीआरझेड १ अ नकाशात येणाºया जमिनींचा समावेश आहे. यामध्ये कांदळवन जंगल, कांदळवनसदृश जमिनी, खाडीलगतच्या पाणथळ जमिनी, जेथे पक्षी घरटी बांधतात अशी ठिकाणे, भरती सुकतीमधील ठिकाणे, अशी जैव विविधता टिकण्यासाठी आवश्यक असलेली विविध संवेदनक्षम ठिकाणे यांचा समावेश आहे.

सागरी अधिनियमात यापूर्वी मालवण, आचरा व रत्नागिरी यांचा सरसकट समावेश होता. मात्र, आता जिल्हाधिकाºयांकडून वरीलप्रमाणे ठिकाणे केवळ सागरी अधिनियमासाठी निश्चित करण्यात येणार आहेत.त्यामुळे जैवविविधतेसाठी व ती टिकण्यासाठी एक आराखडा बनविता येईल. तसेच सरसकट जो भाग सागरी अधिनियमात येत होता, तो न येता प्रत्यक्षात संवेदनक्षम असलेल्या भागाचाच समावेश यात होईल. असे किती क्षेत्र आहे याची परिपूर्ण माहिती येत्या दोन दिवसांत सर्व्हे नंबरसह जाहीर करण्यात येईल. त्यानंतर त्यावर ५ आॅक्टोबरपर्यंत हरकती मागवून हे क्षेत्र निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.