शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

एटीएम घोटाळ््यातील दोन संशयितांना अटक

By admin | Updated: April 11, 2017 00:35 IST

चिपळूण येथील प्रकरण; भरण्यासाठी दिलेल्या रकमेत कोट्यवधींची अफरातफर

रत्नागिरी : एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या पैशातून १ कोटी २६ लाख ९६ हजारांची अफरातफर करणाऱ्या टोळीतील दोघांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. नीलेश नंदकुमार लाड व नीलेश मनोहर पवार अशी या दोघांची नावे असून, या टोळीचा म्होरक्या सुशील सुभाष मोरे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यानेच या फसवणुकीतील ९५ टक्के पैसे वापरले असल्याचे तपासात पुढे आले आहे.चिपळूण येथे एटीएममध्ये भरण्यासाठी देण्यात आलेल्या रकमेमध्ये कोट्यवधीची अफरातफर झाल्याचा प्रकार २४ मार्च रोजी उघड झाला होता. याप्रकरणी अरविंद अण्णासोा बनगे यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. सिक्योरिट्रान्स इंडिया प्रा. लि. कोल्हापूर ही कंपनी एटीएममध्ये रक्कम भरणा करण्याचे काम करते. आॅगस्ट २०१६ ते १८ नोव्हेबर २०१६ या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, खेर्डी, चिपळूण, सावर्डे, मार्गताम्हाणे, संगमेश्वर, लोटे व शिरगांव येथील एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम या कंपनीकडे होते. या कंपनीमार्फत सुशील सुभाष मोरे (रा. पोफळी), नीलेश पवार (रा. काटे) व नीलेश लाड (रा. चिपळूण) हे तिघे एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करत होते.आॅगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत सुशील मोरे, नीलेश लाड व नीलेश पवार यांनी एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या पैशातून थोडे-थोडे पैसे बाजूला काढले. कंपनीला खोटे संदेश पाठवून संपूर्ण रक्कम भरल्याची माहिती देत होते. थोडे-थोडे करत त्यांनी सुमारे १ कोटी २६ लाख ९६ हजारांची अफरातफर केली. त्यानुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्"ाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ नीलेश लाड व नीलेश पवार यांच्या मुसक्या आवळल्या. या कोट्यवधीच्या फसवणुकीत सुशील हाच या टोळीचा म्होरक्या असल्याचे तपासात पुढे आले. १ कोटी २६ लाख ९६ हजार रुपयांतील ९५ टक्के पैशाचा वापर त्यानेच केला असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींकडून पुढे आली आहे.नीलेश लाड व पवार यांनी फसवणुकीतील रकमेतून जो काही पैसा मिळाला, तो आपली व्यसने व घर खर्चासाठी वापरला असल्याचा कबुली जवाब दिला आहे. या दोघांनाही पोलीस कोठडी सुनाविण्यात आली असून, म्होरक्या सुशीलही लवकरच ताब्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)सुशीलचा अटकपूर्व जामीन फेटाळलासुशील मोरे याने अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्ज ४ एप्रिल रोजी केला होता. त्यावर ७ एप्रिलला सुनावणी झाली आणि न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यामुळे लवकरच सुशीलच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत.नोटाबंदीने उघड केला घोटाळाज्या पद्धतीने या तिघांनी एटीएमसाठीच्या रकमेत जो अपहार केला तो आणखी बराच काळ पुढे सुरू राहिला असता. मात्र नोव्हेंबरमध्ये नोटाबंदी निर्णय लागू झाल्यानंतर कंपनीने आॅडीट सुरू केले. त्यातून ही अफरातफर झाल्याचे पुढे आले.