चिपळूण : येथील बहादूरशेख नाका परिसरातील एका नामांकित लॉजमध्ये पुणे येथील दोन शेअर व कमोडीटी मार्केट व्यावसायिकांनी विष पिऊन आत्महत्या केली. व्यवसायात तोटा झाल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे पत्र त्यांनी लिहून ठेवले आहे. ही घटना काल, शुक्रवारी मध्यरात्री घडली. महेश विजय कुलकर्णी (वय ४२, रा. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलजवळ, पुणे ) व मिलिंद पंडितराव पुजारी (४४, रा. पटवर्धननगर, पुणे, मूळचे कोल्हापूर) हे गुरुवारी रात्री आठ वाजता लॉजमध्ये आले. त्यानंतर ते तेथेच वास्तव्याला होते. काल रात्रीही ते नेहमीप्रमाणे आपल्या खोलीतच होते.रात्री एक वाजण्याच्या सुमारास या दोघांच्या खोलीतून पाण्यासाठी काऊंटरला फोन केला गेला. लॉजचा कर्मचारी पाणी घेऊन गेला. मात्र, दरवाजा वाजवूनही तो उघडला गेला नाही. त्यामुळे ड्युप्लिकेट किल्लीने दरवाजा उघडण्यात आला असता महेश कुलकर्णी हा मृत्युमुखी पडला होता, तर त्याचा साथीदार मिलिंद पुजारी हा उलट्या करीत होता, असे या कर्मचाऱ्याला दिसले. या लॉजमधील विजय शंकर दाभोळकर (दत्तवाडी खेर्डी) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात याबाबतची खबर नोंदवली आहे.तातडीने ही माहिती पोलिसांना कळविण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, हवालदार पी. एन. साळवी, विवेक साळवी, अमोल यादव, दीपक ओतारी, उमेश यादव यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. पुजारीला रात्री (पान ७ वर)
दोघा शेअर ब्रोकर्सची चिपळुणात आत्महत्या
By admin | Updated: July 19, 2014 23:50 IST