शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

गडनदीत दोन शाळकरी मुले बुडाली

By admin | Updated: June 12, 2017 01:14 IST

एकाचा मृत्यू

कणकवली : कणकवली शहरातील दोन विद्यार्थी आशिये-ब्राह्मणवाडी येथे गडनदी पात्रात शनिवारी सायंकाळी आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. बुडालेल्यांपैकी रामचंद्र दीपक माणगावकर याचा मृतदेह गोपुरी आश्रमाच्या पाठीमागील बाजूस आढळला. तर प्रसन्नजित कुंभवडेकर याचा मृतदेह शोधण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबतची माहिती अशी की, प्रसन्नजित सुमंगल कुंभवडेकर (१६, रा. कुडाळकर निवास, आचरा रोड-कणकवली) व रामचंद्र दीपक माणगावकर (१४, रा. मसुरकर किनई रोड, कणकवली) हे दोन शाळकरी मुलगे शनिवार १० जून रोजी सायंकाळी ४ वाजता घरातून बाहेर पडून गडनदी पात्रात आंघोळीसाठी गेले होते. प्रसन्नजितने भगव्या रंगाचे टी शर्ट, निळ्या रंगाची हाफ पँट घातली होती, तर रामचंद्रने टी शर्ट व बर्मुडा घातला होता. शनिवारी सायंकाळी ७ वाजल्यानंतर प्रसन्नजित नेहमीप्रमाणे घरी न आल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याचे मित्र हर्षद, किरण व करण यांच्याकडे फोनद्वारे चौकशी केली. मात्र प्रसन्नजित आपल्याकडे आला नसल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. त्यानंतर प्रसन्नजितची आई सुकन्या व वडील सुमंगल कुंभवडेकर यांना दीपक माणगावकर भेटले. त्यांच्याजवळ प्रसन्नजितची चौकशी केली असता दीपक माणगावकर यांनी आपला मुलगा रामचंद्रही बेपत्ता असल्याचे सांगितले. या बेपत्ता दोन शाळकरी मुलांचा शोध घेऊनही ते न सापडल्यामुळे रात्री १ वाजता प्रसन्नजित व रामचंद्र बेपत्ता असल्याची तक्रार प्रसन्नजितची आई सुकन्या सुमंगल कुंभवडेकर यांनी कणकवली पोलीस स्थानकात दिली. प्रसन्नजित व रामचंद्रच्या नातेवाईकांनी, ग्रामस्थांनी, पोलिसांनी तसेच आपत्ती निवारण कक्षातर्फे वागदे तलाठी शरद शिरसाट व कलमठ तलाठी राहुल निग्रे यांनी गडनदी पात्रात शोधमोहीम सुरू केली. प्रसन्नजित व रामचंद्र नेमके कुठे गेले हे कुणालाच सुरुवातीला माहिती नव्हते. मात्र प्लास्टिक पिशवी घेऊन ते टी शर्ट व बर्मुडावर गेल्यामुळे ते आंघोळीला गेले असावेत, असा अंदाज करून नातेवाईकांनी गडनदी पात्रात शोधमोहीम सुरू केली. या शोध मोहिमेसाठी आमदार नीतेश राणे यांची खासगी बोट, एक दोरी, जॅकेट व रिंग असे सामान वापरण्यात आले. पाऊस सुरू असल्यामुळे गडनदी पात्रात गढूळ पाणी आहे. त्यामुळे शोधमोहिमेत अडथळे येत होते. सायंकाळी दोन पाणबुडे आल्यानंतर पाणबुड्याद्वारे शोधमोहीम हाती घेण्यात आली. अखेरीस पाणबुड्याला सायंकाळी ७ च्या सुमारास रामचंद्र माणगावकरचा मृतदेह गोपुरी आश्रमाच्या पाठीमागील बाजूस गडनदी पात्रात सापडला. प्रसन्नजित कुंभवडेकरने अंबरनाथ येथे दहावीची परीक्षा दिली होती, तर रामचंद्र माणगावकर हा उर्सुला इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होता. रात्री उशिरापर्यंत प्रसन्नजितचा शोध घेण्याचे काम सुरू होते. दोघेही एकुलते एक बुडालेले दोघेही शाळकरी मुलगे आईवडिलांचे एकुलते एक होते. रामचंद्र माणगावकरची आई पिग्मी एजंट असून वडील टेम्पोचालक आहेत. त्यांना सर्व मुलीच असून रामचंद्र हा एकुलता एक मुलगा होता, तर प्रसन्नजीतला तीन बहिणी असून तोही आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या दुर्घटनेमुळे माणगावकर व कुंभवडेकर या दोन्ही कुटुंबांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. रामचंद्र माणगावकरचा मृतदेह सापडल्याचे त्याच्या आईला समजताच आईने हंबरडा फोडला. एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे आई-वडिलांच्या दु:खाला पारावार उरला नाही.