संदीप बोडवेमालवण : गतवर्षी पर्यटन हंगामात राज्यभरातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने आलेल्या पर्यटकांनी येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. यात सुमारे २ लाख १४२ पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्ग दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती येथील बंदर कार्यालयातून देण्यात आली.मालवण या पर्यटननगरीत दाखल होणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला किल्ले सिंधुदुर्ग होय. दरवर्षी देश, विदेशातून लाखोंच्या संख्येने पर्यटक मालवणास भेट देत समुद्रातील किल्ले सिंधुदुर्गचे दर्शन घेतात. किल्ले सिंधुदुर्गला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी वाढच होत असल्याचे दिसून येते. वर्ष समाप्तीच्या पर्यटन हंगामातही लाखो पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्ग दर्शनाचा लाभ घेतल्याचे दिसून आले.पर्यटकांचा ओघ वाढलामालवणचे पर्यटन हे पर्यटकांसाठी एक वेगळीच पर्वणी असते. येथील संस्कृती टिकविणारे खाद्यपदार्थ, कोकणी मेवा, पाहुणचार, दर्जेदार सुविधा यामुळे मालवणला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. येथील नवनवीन आकर्षणही पर्यटकांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळेच दरवर्षी येथे पर्यटकांचा ओघ हा वाढलेला असल्याचे पाहावयास मिळत आहे.
साशंकता काढली मोडीतगतवर्षीच्या पर्यटन हंगामात वादळ सदृश परिस्थिती, लांबलेला पाऊस, समुद्रातील बदलते वातावरण याचा फटका मासेमारी या प्रमुख व्यवसायाबरोबरच पर्यटन या व्यवसायाला बसल्याचेही दिसून आले. सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या पर्यटन हंगामात येथे पर्यटक दाखल होतील की नाही याबाबत पर्यटन व्यावसायिकांमध्ये साशंकता होती. यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता असल्याने त्याचाही फटका पर्यटन व्यवसायाला बसल्याचे दिसून आले. मात्र पर्यटन व्यावसायिकांना पर्यटक दाखल होतील याची आशा होती. त्यानुसार ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याचे दिसून आले. त्यामुळे अपेक्षित असलेला व्यवसाय या कालावधीत झाल्याचे दिसून आले.
समुद्राबरोबरच कृषी पर्यटनाचा लुटला आनंदख्रिसमस नाताळ सुटी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांकडून किनारपट्टी भागात वास्तव्यासाठी आगाऊ आरक्षणही करण्यात आले होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यातील पर्यटन हे हाऊसफुल्ल बनले. मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांमुळे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची उलाढालही झाली. साहसी जलक्रीडा प्रकारांसह, किल्ले सिंधुदुर्ग दर्शन, रॉक गार्डन, तारकर्ली, देवबाग, वायरी भूतनाथ, दांडी, बंदर जेटी, चिवला बीच, तळाशिल, आचरा बंदर, निवती, खवणे, शिरोडा, देवगड, कुणकेश्वर याभागात पर्यटकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. समुद्री पर्यटनासह कृषी पर्यटनाचा आनंदही पर्यटकांनी लुटल्याचे या हंगामात दिसून आले.
किल्ले सिंधुदुर्ग दर्शन घेतलेल्या पर्यटकांची आकडेवारी अशीसन २०२४...सप्टेंबर - (स्त्री - पुरुष)- ५,६७४ऑक्टोबर - १२,९४४नोव्हेंबर - ७७,२०५डिसेंबर - १ लाख ४, ३१९एकूण : २००१४२
किल्ले सिंधुदुर्गचे दर्शन घेतलेले दोन वर्षांतील पर्यटनाची तुलना..२०२३सप्टेंबर ३,९८८ऑक्टोबर ९,९६२नोव्हेंबर ४५,८२९डिसेंबर ६२,७६६एकुण : १,२२,५४५