शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत झाड कोसळून दोघांचा मृत्यू; सर्वपक्षीय नेते आक्रमक, मंत्री केसरकरांकडून मदतीचे आश्वासन

By अनंत खं.जाधव | Updated: September 27, 2023 17:33 IST

सावंतवाडी : सावंतवाडी मंगळवारी रात्रीच्या वेळी झाड पडून दोघा युवकांचा मृत्यू झाला होता या युवकांच्या कुटुंबियांना अर्थिक मदत दिली ...

सावंतवाडी : सावंतवाडी मंगळवारी रात्रीच्या वेळी झाड पडून दोघा युवकांचा मृत्यू झाला होता या युवकांच्या कुटुंबियांना अर्थिक मदत दिली जावी या मागणीसाठी बुधवारी सर्वपक्षीय नेते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी नगरपरिषद प्रशासनास धारेवर धरत जोपर्यंत पीडित कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा पवित्रा घेतला.अखेर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे नगरपरिषद सभागृहात दाखल होत या युवकांच्या कुटुंबियांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देणार तसेच मी व्यक्तिगत मदत करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वपक्षीय नेते शांत झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, तहसिलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी सागर साळुंखे तसेच विद्युत विभागाचे कुमार चव्हाण, नायब तहसिलदार मुसळे तसेच सर्व पक्षीय नेते आदीसह टेम्पो चालक मालक संघटना पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बँक संचालक महेश सारंग, अॅड.निलिमा गावडे, आनंद नेवगी यांनी घडलेल्या प्रकाराबाबत नगरपरिषदेला जाब विचारला. तसेच विद्युत विभागाचा गलथान कारभार लोकांच्या जीवावर कसा काय बेततो याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान एवढी मोठी घटना घडूनही बैठकीला तहसिलदार श्रीधर पाटील उपस्थित नसल्याने अनेकांनी त्यांच्यावर रोष व्यक्त करत नाराजी व्यक्त केली.या घटनेची माहिती मिळताच मंत्री दीपक केसरकर यांच्यासह आमदार वैभव नाईक नगरपरिषद सभागृहात दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. त्यानंतर मंत्री केसरकर यांनी मुख्यमंत्री निधीतून मदत तसेच व्यक्तिगत मदत देणार असल्याचेही सांगितले. तसेच मृतांचे नातेवाईकांना धीर देत सांत्वन केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर