शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

Sindhudurg: भेडलेमाड तस्करीबाबत आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 19, 2024 18:28 IST

शासकीय वनात भेडलेमाडाच्या पानांची तोड

प्रथमेश गुरववेंगुर्ला : मातोंड येथील शासकीय वनात भेडलेमाडाच्या पानांची तोड करून तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या फिरत्या पथकाने तळवडे येथील बाबल लाडू परब व प्रकाश लाडू जाधव यांना मंगळवारी अटक केली होती. भेडलेमाडाच्या पानांची तोड ही मुंबई-पुणे येथे विक्रीच्या उद्देशाने पाठवण्यासाठी केली असल्याचे या आरोपींनी मान्य केले. दोन्ही आरोपींना बुधवारी वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली.

कोकणात आढळणारे भेडलामाड हे झाड जैवविविधतेला पोषक असून, महत्त्वाची खाद्याची भूमिका बजावते. आपल्या समृद्ध जंगलांमध्ये आढळणारे शेकरू, माकड, वानर, कटिंदर, वटवाघुळे यासोबतच हॉर्नबील, सुतारपक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी हे अन्न व निवाऱ्यासाठी या झाडावर अवलंबून असतात. यासोबतच दोडामार्गमध्ये आढळणाऱ्या वन्यहत्तीचे देखील हे आवडते खाद्य आहे. या झाडांच्या पानांचा वापर पुष्पगुच्छ तसेच मोठमोठ्या समारंभात शोभेसाठी वापर करतात. या पानांना पुणे-मुंबई येथे मोठी मागणी असल्याने काही स्थानिक नागरिक पैशांच्या आमिषाला बळी पडून भेडलेमाड तोड करून किंवा त्याची पाने काढून विक्री करताना दिसून येत आहेत.

आपल्या मालकी क्षेत्रात सुरु असलेली भेडलेमाड झाडांची व पानांची तोड रोखावी व शासकीय जंगल हद्दीत कुणी तोड करत असेल तर तात्काळ जवळच्या वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा १९२६ या टोल फ्री क्रमांकावर कळवावे, असे आवाहन सावंतवाडी वनविभागाकडून केले आहे. यादरम्यान आरोपीच्या बाजूने ॲड. सुनील मालवणकर यांनी तर वनविभागाच्या बाजूने फिरते पथक वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी युक्तिवाद केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग