शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खवले मांजराच्या खवल्याची तस्करी प्रकरणी दोघे ताब्यात, सावंतवाडी वनविभागाची कारवाई 

By अनंत खं.जाधव | Updated: November 8, 2023 19:16 IST

सावंतवाडी : बांदा येथे खवले मांजराच्या खवल्याची तस्करी होणार असल्याचे माहिती मिळाल्याने वनविभागाकडून आज, बुधवारी दुपारी बांदा प्राथमिक आरोग्य ...

सावंतवाडी : बांदा येथे खवले मांजराच्या खवल्याची तस्करी होणार असल्याचे माहिती मिळाल्याने वनविभागाकडून आज, बुधवारी दुपारी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. नारायण सावळाराम नाईक (वय ४८) सद्गुरू मारुती नाईक (५२) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. यावेळी दोन किलो वजनाची खवले मांजराची खवल्यासह दुचाकी ताब्यात घेतली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात खवले मांजराच्या खवल्यांच्या विक्रीचा व्यवहार होणार अशी गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाची टिम सज्ज झाली होती. बांदा येथे दुपारच्या सुमारास वन विभागाच्या टीमने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात सापळा रचला होता. त्याचवेळी संशयित आरोपी नारायण नाईक, सद्गुरू नाईक हे दोघेजण दुचाकी वरून येऊन खवल्यांचा व्यवहार करताना वन विभागाच्या सापळ्यात सापडले. ही कारवाई सावंतवाडी उपवनसंरक्षक श्री. एस नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, वनपाल पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक प्रकाश रानगिरे, अप्पासो राठोड यांच्या पथकाने केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग