शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्रांमुळे वाजले लोकसभा निवडणुकीचे बिगुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 06:25 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने नव्याने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन मतदान प्रक्रियेसाठी आणल्या आहेत.

कणकवली : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने नव्याने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन मतदान प्रक्रियेसाठी आणल्या आहेत. त्या ‘वोटर व्हेरिफीयेबल पेपर आॅडिट ट्रे’ या मशीनचे प्रात्यक्षिक सिंधुदुर्गात सुरू करण्यात आले आहे. त्याची सुरुवात कणकवली विधानसभा मतदारसंघ २६८ मध्ये २४ डिसेंबरपासून प्रशिक्षित दोन टिमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही दोन पथके ३३० मतदान केंद्रांवर मतदारांना प्रशिक्षण व जनजागृती करणार असल्याची माहिती कणकवली प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी दिली.कणकवली तहसील कार्यालय येथे व्हीव्हीपॅट यंत्राच्या प्रात्यक्षिकाचे सादरीकरण शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांसमोर निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले. यावेळी तहसीलदार संजय पावसकर, निवडणूक नायब तहसीलदार एस. एस. कडुलकर, मास्टर ट्रेनर, तलाठी दीपक पावसकर, एस. बी. जाधव, निलेश कदम आदी कर्मचारी उपस्थित होते.व्हीव्हीपॅट व ईव्हीएम यंत्रांचे प्रशिक्षण व जनजागृती मतदारांमध्ये करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅट या मशीनमध्ये डिस्प्ले आहे. ज्या उमेदवाराला मतदान केले त्याचे नाव डिस्प्लेवर मतदान केल्यानंतर ७ सेकंद दिसणार आहे. त्यानंतर त्याची स्लीप कट होऊन मशीनच्या बॉक्समध्ये पडणार आहे.व्हीव्हीपॅट मशीनमध्ये १५०० मतदारांना मतदान करता येणार असून त्या केलेल्या मतदानाचा पुरावा म्हणून स्लीप त्या बॉक्समध्ये पडणार आहे. त्या स्लीपवर उमेदवाराचे नाव, उमेदवाराचे चिन्ह, उमेदवाराचा क्रमांक व व्हीव्हीपॅट मशीनचा नंबर दिसणार आहे. त्यामुळे निवडणूक मतदान प्रक्रियेत मतदारांमध्ये आणखीन विश्वासार्हता निर्माण होईल. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने या मशीनची उपलब्धता केली असून आगामी निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार असल्याचे नीता सावंत-शिंदे यांनी सांगितले.३३० केंद्रांवर प्रात्यक्षिकाची मोहीमकणकवली विधानसभा मतदारसंघात दोन पथकांद्वारे ३३० केंद्रांवर प्रात्यक्षिकाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. व्हीव्हीपॅट मशीनद्वारे सर्वत्र मतदारांमध्ये जनजागृती ही दोन पथके करणार आहेत. या पथकांमध्ये दोन मास्टर ट्रेनर व प्रत्येकी ५ कर्मचारी असणार आहेत. दरदिवशी ४ केंद्रांवर हे व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. हे पथक कुठल्या दिवशी कुठल्या गावात जाणार याची जनजागृती तलाठी, कोतवाल, बीएलओ, ग्रामसेवक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी या मोहिमेत सहभाग दर्शवून व्हीव्हीपॅट मशीनची माहिती व प्रात्यक्षिक करावे, असे आवाहन नीता सावंत-शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक