शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन सरसकट पंचनामे करा - पालकमंत्री रवींद्र चव्हाण 

By अनंत खं.जाधव | Updated: April 11, 2023 12:58 IST

वळीव पावसामुळे तसेच वादळी वाऱ्याने सह्याद्रीच्या पट्ट्यात तीन ते चार गावांना जोरदार तडाखा

सावंतवाडी : सह्याद्रीच्या पट्ट्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सांगेली, सावरवाड व कलंबिस्त या गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगेली गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून अधिकारी तसेच ग्रामस्थ यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी त्यांनी सरसकट पंचनामे करा कोणीही पंचनाम्यापासून  वंचित राहू नये याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सक्त सूचना दिल्या.वळीव पावसामुळे तसेच वादळी वाऱ्याने सह्याद्रीच्या पट्ट्यात तीन ते चार गावांना जोरदार तडाखा बसला. यात सांगेली गावाचे जवळपास 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांवर मोठमोठी झाडे कोसळली तसेच बागायती नष्ट झाल्या आहेत. या नुकसानीची पंचनामे महसूल विभागाने गेल्या दोन दिवसांपासून सुरू केले आहेत.आतापर्यंत नुकसानीचा आकडा जवळपास निश्चित झाला असला तरी सरसकट पंचनाम्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्वाधिक नुकसान झालेल्या सांगेली गावाला भेट दिली. यावेळी सांगेली ग्रामपंचायतमध्ये अधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेतली.या बैठकीत ग्रामस्थ पुनाजी राऊळ तसेच पंढरी राऊळ यांच्यासह अनेकांनी सातबारावर झाडांची नोंद नाहीत तसेच सर्वाधिक झाडे कोसळून नुकसान झाले आहे. पण पंचनाम्यात सातबारा वर पीक पाण्याची नोंद नसल्याने  झाडे दाखवण्यात येत नाहीत अशी कैफियत पालकमंत्र्यांसमोर मांडली. त्यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी  सरसकट पंचनामे करा जागेवर जाऊन फोटो घ्या आणि त्याचा रितसर अहवाल एका दिवसात तयार करा आणि मला बुधवारी तो मुंबई येथे जिल्हाधिकारी यांच्या सहीने पाठवा असे कृषी व महसूलच्या अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच नुकसान झालेल्या भागाची पाहणी ही त्यानी केली.मंत्री चव्हाण यांचे गावचे सरपंच लहू भिंगारे यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर संजू परब, मनोज नाईक, संदिप गावडे, पंढरी राऊळ, संतोष नार्वेकर, वामन नार्वेकर उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग