शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
4
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
5
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
6
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
7
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
8
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
9
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
10
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
11
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
12
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
13
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
14
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
15
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
16
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
17
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
18
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
19
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
20
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींचे बिगुल अखेर वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 21:44 IST

Grampanchyat, Elecation, Sindhudurgnews सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ७० ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून, १५ जानेवारी २०२१ रोजी या निवडणुका होणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींचे बिगुल अखेर वाजले निवडणूक कार्यक्रम जाहीर : १५ जानेवारीला मतदान

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ७० ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून, १५ जानेवारी २०२१ रोजी या निवडणुका होणार आहे.

यामुळे गावागावात निवडणुकीचा रणसंग्राम दिसून येणार असून, जिल्ह्यातील निवडणुका भाजप विरुद्ध महविकास आघाडी असेच स्वरूप या निवडणुकीत दिसून येणार आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार यांच्यात जोरदार चढाओढ दिसून येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतीची मुदत संपली होती. मात्र या कालावधीत राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर असल्याने या निवडणूक घेण्यात आल्या नव्हता. या ७० ग्राम पंचायती मध्ये मालवण तालुक्यातील ६, देवगड तालुक्यातील २३, कणकवली तालुक्यातील ३, वैभववाडी तालुक्यातील १३, कुडाळ तालुक्यात ९, वेंगुर्ले तालुक्यात २, सावंतवाडी तालुक्यातील ११ तर दोडामार्ग तालुक्यात ३ ग्राम पंचायतचा समावेश असून मुदत संपल्याने आणि निवडणूक न लागल्याने या ग्रामपंचायतींवर शासनाने प्रशासक नियुक्त केले होते.

आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकिसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठीची सोडत १६ ला काढण्यात येणार आहे.आता निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी १५ जानेवारी २०२१ रोजी निवडणूक होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या असून या ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पक्ष आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तसेच इच्छूक उमेदवारांची चढाओढ सुरू झाली आहे.जिल्ह्यात या निवडणुका जरी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये होत असल्या तरी खरी लढत ही भाजपा आणि शिवसनेच्यामध्येच असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे.या ७० ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुकादेवगड तालुक्यातील धालवली, गढीताम्हाणे, इळये, कातवण, कोर्ले, कुणकेश्वर, लिंगडाळ, मिठबाव, मोंड, मोंडपार, मुणगे, मुटाट, नाडण, पाळेकरवाडी, पाटथर, पुरळ, रहाटेश्वर, शिरगांव, तळवडे, तांबळडेग, टेंबवली, वाडा, वरेरी. कणकवली तालुक्यातील भिरवंडे, गांधीनगर, तोंडवली- बावशी.

सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा, आरोस, आंबोली, इन्सुली, डिंगणे, तळवडे, चौकुळ, मळगांव, मळेवाड, कोलगांव, दांडेली. दोडामार्ग तालुक्यातील तेरवण-मेढे, आयनोडे, कुडासे. मालवण तालुक्यातील कुणकवळे, गोळवण-कुमामे, आडवली-मालडी, खरारे-पेंडूर, मसदे-चुनवरे, चिंदर.

वैभववाडी तालुक्यातील सोनाळी, लोरे, मांगवली, कोकिसरे, खांबाळे, एडगाव, वेंगसर, सांगुळवाडी, आचिर्ण, नाधवडे, भुईबावडा, कुंभवडे, ऐनारी. कुडाळ तालुक्यातील वसोली, गिरगांव-कुसगांव, माड्याचीवाडी, वाडोस, कुपवडे, गोठोस, आकेरी, पोखरण-कुसबे, गोवेरी. वेंगुर्ला तालुक्यातील आरवली आणि सागरतीर्थ या दोनग्रामपंचायतचा समावेश आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग