शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना त्रास, सावंतवाडीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 17:38 IST

सावंतवाडी येथील समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात मुलींना त्रास देणे व जेवण न देणे असे प्रकार सुरू आहेत. या तक्रारीवरून वसतिगृहाचे अधीक्षक डी.एस.जाधव, लिपिक धनलता चव्हाण या दोघांची चौकशी करून बदली केली जाईल, असे लेखी आश्वासन समाजकल्याण विभागाचे निरीक्षक गोसावी यांनी उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मंत्री धनंजय मुंडे यांच्या कानी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब घातली. मुंडे यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याच्या सूचना केल्यानंतर लिपिक चव्हाण यांच्या बदलीचे आदेश निघाले.

ठळक मुद्देमागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना त्रास, सावंतवाडीतील प्रकारचौकशीच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

सावंतवाडी : सावंतवाडी येथील समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात मुलींना त्रास देणे व जेवण न देणे असे प्रकार सुरू आहेत. या तक्रारीवरून वसतिगृहाचे अधीक्षक डी.एस.जाधव, लिपिक धनलता चव्हाण या दोघांची चौकशी करून बदली केली जाईल, असे लेखी आश्वासन समाजकल्याण विभागाचे निरीक्षक गोसावी यांनी उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मंत्री धनंजय मुंडे यांच्या कानी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब घातली. मुंडे यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याच्या सूचना केल्यानंतर लिपिक चव्हाण यांच्या बदलीचे आदेश निघाले.आंबोली येथील मागासवर्गीय समाजातील अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला वसतिगृहात त्रास देणे, जेवणाचा डबा न देणे असे प्रकार केले जात आहेत. ती आजारी असताना तिला उपचारासाठी दाखल न करता ज्या वसतिृहातील मुलींनी मदत केली त्या मुलींनाही त्रास दिला जात आहे.

याबाबत तिचे आई-वडील अर्चना व अरुण चव्हाण यांनी समाजकल्याण कार्यालयाजवळ उपोषण छेडले. या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य सुरेश गवस, तानाजी वाडकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम, महिला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रेवती राणे, उदय भोसले, संदीप राणे, सत्यजित धारणकर, भाऊ पाटील, रंजना निर्मले आदी उपस्थित होते. यावेळी सुरेश गवस, रेवती राणे, कदम, भोसले यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले.वडिलांची कैफियतमुलीचे वडील म्हणाले, माझ्या मुलीला गेले काही महिने अधीक्षक जाधव व लिपिक चव्हाण त्रास देत आहेत. अधीक्षक जाधव यांनी माझ्या मुलीला वडील कुठल्या राजकीय पक्षात काम करतात का? असे प्रश्न विचारून त्रास दिला.तानाजी वाडकर यांनी या प्रकरणी लिपीक धनलता चव्हाण यांचे वागणे योग्य नाही. त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी, अशी मागणी केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग