शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चिनी वस्तू विकणारा हा देशद्रोहीच : प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:03 IST

भविष्यात चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी कदाचित तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात जो चिनी वस्तू विकत असेल तो देशद्रोही ठरेल. अशा व्यक्तींना आता जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केले.

ठळक मुद्देजनतेने त्यांना धडा शिकवावा चीनने कोविड-१९ विषाणू पसरवून एकप्रकारे विषाणू युद्ध सुरू केले

कणकवली : चीनने कोविड-१९ हा विषाणू पसरवून एकप्रकारे विषाणू युद्ध सुरू केले आहे. त्या युद्धात कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या जीवावर हे आव्हान संपुष्टात आणले. अमेरिका, युरोपसह संपूर्ण जग भारताकडे चीनशी लढण्याची क्षमता असलेला देश म्हणून पाहत आहे. भविष्यात चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी कदाचित तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात जो चिनी वस्तू विकत असेल तो देशद्रोही ठरेल. अशा व्यक्तींना आता जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केले.कणकवली येथील भाजपा जिल्हा कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप सरचिटणीस मधुसूदन बांदिवडेकर, रवींद्र शेट्ये, बबलू सावंत, समर्थ राणेआदी पदाधिकारी उपस्थित होते.प्रमोद जठार म्हणाले, कोविड-१९ मुळे संपूर्ण जग ग्रासला आहे. चीनची विषाणू निर्मिती ही युद्धनीती आहे. अमेरिका व युरोप या महासत्तांचे केंद्र भारताकडे वळले आहे. हे चीनच्या लक्षात आले आहे.हिंदुस्थान या देशातील लोकसंख्येचा उपयोग करून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला महासत्ता बनवतील. हे चीन ओळखून आहे. तेव्हाच वुहान शहरात कोविड-१९ निर्मिती झाली. त्यावेळी चीनने विषाणू युद्ध केले, हे जगाच्या लक्षात आले, असेही प्रमोद जठार यांनी सांगितले.३७० कलम रद्द केल्यानंतर चीनचे धाबे दणाणलेहिंदुस्थानातील नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व चीनला धडा शिकवेल. देशात प्रथमच भारतीय सैन्याला पूर्ण अधिकार दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी चिनी वस्तू विकू नयेत. आपला देशाभिमान जागरूक करावा. देशातील ३७० कलम रद्द केल्यानंतर चीनचे धाबे दणाणले आहेत, असेही जठार यांनी यावेळी सांगितले.फोटो : प्रमोद जठार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPramod Jatharप्रमोद जठारchinese dragonचिनी ड्रॅगन