शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-दोडामार्गमध्ये रशिया, इंग्लंडमधील पर्यटकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 16:22 IST

विदेशाबरोबरच भारतातही कोरोनाची साथ पसरल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. गोवा राज्यात पर्यटनासाठी येत असलेल्या विदेशी पर्यटकांकडून गोव्यात साथ पसरल्याचे समोर आले आहे. हे पर्यटक गोव्यातून दोडामार्गच्या दिशेने येत असल्याने त्यांची दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. रविवारी बारा पर्यटकांची दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना सोडण्यात आले.

ठळक मुद्देदोडामार्गमध्ये रशिया, इंग्लंडमधील पर्यटकांची तपासणीकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दक्षता

दोडामार्ग : विदेशाबरोबरच भारतातही कोरोनाची साथ पसरल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. गोवा राज्यात पर्यटनासाठी येत असलेल्या विदेशी पर्यटकांकडून गोव्यात साथ पसरल्याचे समोर आले आहे. हे पर्यटक गोव्यातून दोडामार्गच्या दिशेने येत असल्याने त्यांची दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. रविवारी बारा पर्यटकांची दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना सोडण्यात आले.विदेशात पसरलेल्या कोरोना व्हायरसने हजारो लोकांचा बळी घेतला. अनेक देशात या व्हायरसचा फैलाव झाला. भारतातही कोरोना सदृश रुग्ण आढळू लागल्याने खळबळ माजली. विदेशी पर्यटकांकडून या व्हायरसचा फैलाव होऊन आपल्या देशातील लोकांना त्याची लागण झाली.

पुणे शहरात विदेशावरून आलेल्या एका पर्यटकाकडून ही साथ पसरल्याचे समोर आले. तर गोवा येथेही चार रुग्ण कोरोनासदृश सापडले. त्यात दोन विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. विदेशातून येणाऱ्या पर्यटकांपासून या व्हायरसचा फैलाव होत आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक विदेशी पर्यटकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक विदेशी पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांना देण्यात आले आहेत.दोडामार्ग तालुका गोव्याला लागूनच असल्याने येथे आलेल्या पर्यटकांची येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. रविवारी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात बारा पर्यटकांची डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. रामदास रेडकर, डॉ. दिव्या गवस यांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यात रशियन १० तर इंग्लंडमधील २ पर्यटकांचा समावेश होता. तर शनिवारी भेडशी येथे आलेल्या पाच पर्यटकांचीही तपासणी करण्यात आली होती. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना सोडण्यात आले.रविवारी दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलेले विदेशी पर्यटक गोव्यातून प्रथम विर्डी येथील स्वप्नगंधा या हॉटेलवर गेले होते. मात्र, त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश न देता प्रथम कोरोना व्हायरस तपासणीसाठीसाठी हॉटेल व्यवस्थापक समीर नाईक यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी करून त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. हॉटेल व्यावसायिकांच्या या सतर्कतेबाबत आरोग्य विभागाने कौतुक केले. 

टॅग्स :corona virusकोरोनाtourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्ग