शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची!

By admin | Updated: September 28, 2015 23:33 IST

पर्यटन दिन चर्चासत्र : पर्यटकांसाठी लाईफ जॅकेट सक्तीवर एकमत

मालवण : पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तारकर्ली-देवबागला पहिली पसंती देणाऱ्या पर्यटकांचे उत्साहाच्या भरात आणि सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालेले मृत्यू दुर्दैवी आहेत. शासनस्तरावर पर्यटकांच्या सुरक्षेबाबत उपयोजनाची कार्यवाही प्रस्तावित आहे. तारकर्ली पर्यटन व्यावसायिक संस्थेतर्फे मालवण किनारपट्टीवर देवबाग, तारकर्ली, मालवण, धुरीवाडा, दांडी या परिसरात खासगी जीवरक्षक नियुक्त करून त्यांना संस्थेच्यावतीने पगार देण्यात येईल. तर पर्यटकांना समुद्रस्नान व पर्यटनाचा मनमुराद आनंद किनारपट्टीवर लुटता यावा यासाठी सुरक्षित किनारे ही संकल्पनाही राबवली जाणार आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने तारकर्ली पर्यटन व्यावसायिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन चर्चासत्रात सर्वच व्यावसायिकांनी पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची असल्याचे मत व्यक्त केले.येथील हॉटेल महाराजा येथे टीटीडीएस संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली या चर्चासत्राचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी विजय केनवडेकर, गुरू राणे, अविनाश पराडकर, अरविंद मोंडकर, अभय पाटकर, सुरेश मसुरकर, महेश मांजरेकर, रुपेश प्रभू, सचिन गोवेकर, नंदुकमार सावंत, गणेश कुशे, अनंत मयेकर, प्रसन्नकुमार मयेकर, यशोधन पडवळ, अवधूत चव्हाण, महेश सावंत, रुजाय फर्नांडिस, मिथीलेश मिठबावकर, नारायण माडये, बबन शेलटकर, समित कोळगे, पंकज पेडणेकर उपस्थित होते.राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय पर्यटन विकास समिती गठीत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र, प्रशासनाकडून चलढकलपणा केला जात आहे. ही समिती गठीत झाल्यास त्यात जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था तसेच उद्योजकांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सर्व अधिकारी व पदाधिकारी हे पर्यटन विषयातील पदवीधर असावेत. बदली म्हणून इतर खात्यातील कर्मचारी महामंडळाच्या सेवेत आणू नयेत. जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीसाठी अद्यावत संकेत केंद्र निर्माण करावेत. पर्यटन महामंडळाचे प्रकल्प चालविण्याचा ठेका स्थानिक संस्थांनाच देण्यात यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. पर्यटन राज्यमंत्र्यांची मंगळवारी २९ रोजी भेट घेण्यात येणार असल्याचे बाबा मोंडकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)खासगी जीवरक्षक नियुक्त करणारतारकर्ली आणि देवबाग येथे गेल्या दीड महिन्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या मृत्यूबाबत गांभिर्याने चर्चा करण्यात आली. लाईफ जॅकेट सक्तीचे करण्यावर एकमत केले.शासनाकडे सुमारे एक हजार लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्याचेही ठरविण्यात आले.देवबाग, तारकर्ली, मालवण, धुरीवाडा, दांडी या परिसरात खासगी जीवरक्षक नियुक्त करून त्यांना संस्थेच्यावतीने पगार देण्यात यावा, असेही सूचविले.