शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

चिपळुणातही पर्यटन प्रकल्प उभारणीस वाव

By admin | Updated: June 17, 2015 00:41 IST

आढावा बैठक : पर्यटनाच्या मुद्द्यावर केली चर्चा..

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पर्यटन प्रकल्प, व्यावसायिक, पर्यटनप्रेमी, निसर्ग पर्यावरणप्रेमी यांचे संघटन आणि संकलन करणे याबरोबरच पर्यटन प्रकल्प उभारणीस चालना देण्याच्या मुद्द्यांवर पर्यटन विकास आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली.लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे ग्लोबल चिपळूण मल्टीपर्पज सोसायटी, लोटिस्मा, अपरांत संशोधन केंद्र, कृषी वसंत शेतकरी विकास संघ यांच्यातर्फे पर्यटन विकास आढावा सहविचार बैठक झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अभियंता सुरेश भोसले होते. यावेळी प्रकाश देशपांडे, श्रीराम रेडीज, संजीव अणेराव, शहनवाज शाह, सुभाष ओतारी, सुशील ओतारी, अविनाश पोंक्षे, मल्हार इंदुलकर, डॉ. रत्नाकर थत्ते, निर्मला चिंगळे आदींसह निसर्ग व पर्यटनप्रेमी उपस्थित होते.पर्यावरण व पर्यटन उभारणीसाठी शासन, प्रशासन यांच्या सहयोगातून परस्परांना प्रोत्साहन देणे, पर्यटकांसाठी पॅकेज टूर्स आयोजित करणे, पर्यटन केंद्राचा समन्वय राखणे, कार्यशाळा आयोजित करणे, पर्यटकांसाठी मार्गदर्शन शिबिरे घेणे, पर्यटक मार्गदर्शकांची एक फळी उभी करणे, पुरातन ऐतिहासिक, पारंपरिक वस्तूंचे संकलन करणे, यावर भर देणे, संग्रहालय उभारणे, अभिनव पर्यटन संकल्पनाचे संशोधनपर अभ्यास करणे, प्रेक्षणीय स्थळांचे संकलन करणे, दस्तऐवजीकरण, माहितीपुस्तिका दृकश्राव्य माहितीपट तयार करुन त्याचे लोकाभिमुखीकरण व प्रसिद्धी करणे आदी विकास मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार प्रत्यक्ष कृतीप्रणव होण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रास्ताविक बापू काणे यांनी केले. समीर कोवळे यांनी आभार मानले. टिळक स्मारक वाचन मंदिरात झालेल्या बैठकीत पर्यटनविषयक विकासावर चर्चा करण्यात आली. चिपळुणला ऐतिहासिक महत्व असून पर्यटन प्रकल्पामध्ये अशा गोष्टींबाबत सविस्तर माहितीचा समावेश करण्यावर भर देण्यात आला. (वार्ताहर)विविध माध्यमातून प्रयत्न सुरू कोकणात पर्यटन वाढीला चालना देण्याच्या हेतूने अनेक प्रयत्न सुरू असून, त्यातील एक भाग म्हणून जिल्ह्यातील विविध पर्यटन प्रकल्पांची उभारणी कशी करता येईल व त्यातून विकासाचा द्वारे कशी खुली होतील, याचा प्रयत्न सुरू राहिला आहे. चिपळूणमध्ये ग्लोबल चिपळूण मल्टीपर्पज सोसायटी, लोटिस्मा, अपरांत, संशोधन केंद्र, कृषी वसंत शेतकरी विकास संघातर्फे पर्यटन विकास आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपाययोजांवर चर्चा करण्यात आली.