मालवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने गोव्यातील कॅसिनो, डिस्को क्लब, हॉटेल, जहाजांमधून पर्यटकांसाठी जलसफर बंद केली. त्यामुळे गोव्यातील देशी-विदेशी पर्यटक मालवणात दाखल होत असल्याने सकाळपासूनच मालवण पोलिसांनी सतर्कता बाळगत गोवा तसेच अन्य भागातून येणाऱ्या गाड्यांमधील पर्यटकांना थेट मालवण ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी पाठविले. गोव्यातून मालवणात आलेल्या पर्यटकांमध्ये अनेक पर्यटक विदेशी असल्याचे पोलिसांच्या पाहणीत समोर आले आहे.महाराष्ट्रात वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांचा ओढा असल्याने आरोग्य व पोलीस यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. शहरातील भरड नाका येथे रविवारी सकाळपासून पर्यटकांच्या वाहनांची तपासणी मोहीम कडक झाल्याने ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. महसूल विभागही तपासणीसाठी आलेल्या पर्यटकांची नोंद ठेवत आहे.पोलिसांनी पर्यटकांचे नाव व पत्ता आदींची नोंदणी करून ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरमार्फत प्राथमिक तपासणीसाठी पाठविले आहे. पर्यटकांना ह्यकोरोनाह्णसदृश लक्षणे असल्यास पुढील तपासणीसाठी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे पाठविले जाईल. तपासणीत लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सोडण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालयात संशयित कोरोनाबाधित रुग्णांसाठी विशेष वॉर्ड बनविण्यात आला आहे.पोलिसांकडून खबरदारीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी विशेष सतर्कता बाळगत पोलीस कर्मचाऱ्यांना राज्याबाहेरील व अन्य भागातून येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या थांबवून त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी कार्यवाही करताना गोव्यातून मालवणात दाखल झालेल्या तीन आराम बसेसमधील पर्यटकांना आरोग्य तपासणी करून घेण्याची सक्ती केली.
corona virus-पर्यटक थेट रुग्णालयात, महसूल विभागाकडूनही नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 16:27 IST
गोव्यातील देशी-विदेशी पर्यटक मालवणात दाखल होत असल्याने सकाळपासूनच मालवण पोलिसांनी सतर्कता बाळगत गोवा तसेच अन्य भागातून येणाऱ्या गाड्यांमधील पर्यटकांना थेट मालवण ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी पाठविले.
corona virus-पर्यटक थेट रुग्णालयात, महसूल विभागाकडूनही नोंदी
ठळक मुद्देपर्यटक थेट रुग्णालयात, कोरोना व्हायरसचा धसका महसूल विभागाकडूनही पर्यटकांच्या नोंदी