शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मालवणात पर्यटनाला ब्रेक : होडी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडा प्रकार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:15 IST

मालवण : ह्यकोरोनाह्णचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किल्ले प्रवासी होडी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडा प्रकार पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश ...

मालवण : ह्यकोरोनाह्णचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किल्ले प्रवासी होडी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडा प्रकार पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. किनारपट्टी भागातील पर्यटन ठप्प झाले आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांनीही आपले व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखोंची उलाढाल थांबली आहे. कोरोनाचा मोठा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसला आहे.

जिल्ह्याची पर्यटन राजधानी म्हणून मालवणकडे पाहिले जाते. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून येथील पर्यटन व्यवसाय अवकाळी पाऊस, चक्रीवादळे यांसारख्या समस्यांमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यात आता भर पडली आहे ती कोरोना व्हायरसची.

गणेशोत्सव, दिवाळीचा हंगाम कोरडाच गेल्याने उन्हाळी सुटीतील पर्यटनाचा हंगाम बहरेल आणि झालेले नुकसान भरून काढता येईल अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिकांना होती. मात्र, कोरोना व्हायरसमुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे.उन्हाळी सुटीच्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे दाखल होत असल्याने त्यादृष्टीने पर्यटन व्यावसायिकांनी नियोजन केले होते. मात्र, सर्व पर्यटन व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केल्याने याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे. भविष्याचा विचार करता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे अत्यावश्यक असल्याने याचा गांभीर्याने विचार करीत शहरासह किनारपट्टी भागातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी स्वत:हून पुढाकार घेत आपले व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास येणाऱ्या अनेक पर्यटकांनी आपली रिसॉर्ट, लॉजिंगची केलेली आरक्षणे रद्द केली आहेत. यामुळे पर्यटन व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षीचा पर्यटन हंगामही धोक्यात आला असून पर्यटन व्यावसायिकांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जलक्रीडा प्रकार, किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा, आठवडा बाजार पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे एरव्ही गजबजलेली बंदरजेटी मंगळवारी ओस पडल्याचे चित्र होते.पर्यटन व्यवसायावर मोठे संकट कोरोनामुळे पर्यटन व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणेही महत्त्वाचे असल्याने त्यादृष्टीने पर्यटन व्यावसायिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत पर्यटन व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे येत्या एप्रिल महिन्यापर्यंत जिल्ह्यात अशीच परिस्थिती राहील अशी चिन्हे आहेत.

प्रवासी होड्या किना-यावर उभ्या, पर्यटकांची संख्याही रोडावलीप्रवासी होड्या किना-यावर उभ्या करून ठेवल्या होत्या. गोव्यातील कॅसिनो, हॉटेल्स बंद केल्याने गेले दोन, तीन दिवस गोव्याकडे जाणारे पर्यटक येथे दाखल होत होते. त्यामुळे सतर्कतेच्या दृष्टीकोनातून परराज्यातून, विदेशातून येणाºया पर्यटकांची ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात येत होती. मात्र, मंगळवारपासून सर्व पर्यटन व्यवसाय बंद असल्याने येथे येणा-या पर्यटकांची संख्याही रोडावल्याचे दिसून आले. 

टॅग्स :konkanकोकणtourismपर्यटन