शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

रानफुलांचा महोत्सव पर्यटकांचे आकर्षण

By admin | Updated: September 30, 2014 00:23 IST

आंबोली परिसर झळाळला

आंबोली : आंबोली, चौकुळ व गेळे परिसरात सध्या रानफुलांचा उत्सव भरला आहे. याठिकाणी निसर्ग पर्यटनासाठी विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांचेही ही फुले लक्ष वेधून घेत आहेत. आंबोली व आजूबाजूच्या गेळे व चौकुळ या गावांमध्ये वातावरण जवळजवळ सारखेच असते. धुके, पाऊस, दऱ्या, निमसदाहरित जंगल, नद्या, ओढे, शेती, राहणीमान सगळं काही सारखंच. ३०० ते ३५० इंच इतका पाऊस याठिकाणी पडतो. जैवविविधतादृष्ट्या संपूर्ण पश्चिम घाटात या तीनही गावांना अनन्य साधारण महत्त्व आहे. या गावामध्ये तब्बल १३९ प्रजातींची रानफुले आढळून येतात. गुलाबी, निळ्या, सफेद, लाल, तपकिरी अशा विविध रंगांमध्ये फुलणारी ही फुले मन मोहून टाकतात.साधारणपणे आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात या फुलांचा बहर येऊ लागतो. ऊन, पाऊस, धुके अशाप्रकारे वातावरण या फुलांच्या बहरासाठी पोषक असते. तेरडा, बुगडी, सांगाडी, तपकी या आणि अशा अनेक गमतीदार नावांनी ही फुले ओळखली जातात. चौकुळ येथील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी या ठिकाणच्या फुलांचा, वनस्पतींचा शास्त्रीय अभ्यास केला आहे. या फुलांसोबत या फुलांवर भिरभिरणारे किटक व फुलपाखरेही मन मोहून टाकत आहे. फुले म्हटली की, सगळ्यांच्या आवडीचा विषय. त्यामुळे तुम्हालाही या फुलांची छायाचित्रे काढण्याचा मोह आवरणार नाही, एवढे मात्र नक्की. (वार्ताहर)