शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

पर्यटन व्यावसायिकांनी नोटिसा स्वीकारून आपली बाजू मांडावी

By admin | Updated: March 28, 2015 00:07 IST

पोलिसांचे आवाहन : पर्यटन व्यावसायिक नोटिसा स्वीकारण्यास तयार

मालवण : सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी बजावलेल्या नोटिसा नाकारणाऱ्या तारकर्ली व देवबाग येथील पर्यटन व्यावसायिकांनी शुक्रवारी पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांची भेट घेऊन या नोटिसा स्वीकारण्यास तयारी दर्शवली. यावर बुलबुले यांनी संबंधित व्यावसायिकांनी नोटिसा स्वीकारून १ एप्रिल रोजी पोलिसांसमवेत एकत्रित बैठक घेऊन उपलब्ध कागदपत्रांसहीत आपली बाजू मांडावी, असे सांगितले.अनधिकृत बांधकामप्रकरणी महसूल विभागाने स्कुबा डायव्हींग सेंटरसह तारकर्ली व देवबाग येथील २३ पर्यटन व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले होते. यानंतर पोलिसांनी बजावलेल्या नोटिसा या व्यावसायिकांनी प्रथमत: नाकारल्या होत्या. मात्र, शुक्रवारी भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली या पर्यटन व्यावसायिकांनी पोलिसांची भेट घेऊन नोटिसा स्वीकारण्यास तयारी दर्शवली. यावेळी बाबा मोंडकर यांनी या व्यावसायिकांची बाजू मांडताना यापूर्वीही प्रशासनाकडून बजावण्यात आलेल्या नोटिसांना व्यावसायिकांनी उत्तरे दिली होती. मात्र, त्या उत्तरांनी प्रशासनाचे समाधान न झाल्याने आता फौजदारी कारवाई करण्यात आली आहे, असे सांगितले. तारकर्ली- देवबाग भागात पर्यटन वाढीस मोठा वाव असताना केवळ कायद्यांतील त्रुटींमुळे पर्यटन व्यवसायास अडथळे येत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांवर दाखल झालेले गुन्हे अन्यायकारक आहेत, असे सांगून तहसील कार्यालयापासून जवळच असणाऱ्या मालवणातील काही अनधिकृत बांधकामांवर कारवाई का केली जात नाही, असा सवालही मोंडकर यांनी उपस्थित केला. मोंडकर यांनी पर्यटन व्यावसायिकांवरील अन्याय दूर करण्यात पोलिसांचेही सहकार्य आवश्यक आहे, असे सांगितले. पोलीस निरीक्षक बुलबुले यांनी कारवाईच्या प्रक्रियेत व्यावसायिकांनीही सहकार्य करून या नोटीसा स्विकाराव्यात. तसेच एकत्रित बैठकीत आपली बाजू मांडावी, असे सांगितले. (प्रतिनिधी)