शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

जिल्ह्यातील ४३ शेतकऱ्यांसाठी सहल

By admin | Updated: January 7, 2015 23:53 IST

कृषी विभागातर्फे आयोजन

सिंधुदुर्गनगरी : कृषी विभागामार्फत सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्ह्यातील ४३ शेतकऱ्यांसाठी जानेवारी २०१५ मध्ये शेतकरी सहलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली.राज्यामध्ये कृषी क्षेत्रात झालेला बदल, कृषी तंत्रज्ञानाबाबत झालेली प्रगती, निरनिराळ््या पीक लागवड पद्धतीने माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे व प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रास भेटी देऊन शेतकऱ्यांना माहिती देण्यात येते. तसेच प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतात. त्यासाठी या शेतकरी सहलीचे कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे.शेतकरी सहलीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी प्रवेश अर्जासोबत सातबारा उतारा जोडणे आवश्यक असून या शैक्षणिक सहलीचा प्रवास खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. मुक्कामाची सोय, दैनंदिन गरजा व जेवणाचा खर्च शेतकऱ्यांनी स्वत: करावयाचा आहे. सहल कालावधीमध्ये प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. वैद्यकीय समस्या किंवा कोणताही आजार उद्भवल्यास येणारा खर्च लाभार्थ्याने स्वत: करावयाचा आहे. तसेच गंभीर आजार असल्यास तशी नोंद प्रवेश अर्जामध्ये करावयाची आहे. अर्जदार शेतकऱ्यांनी प्रवेश अर्जासोबत अनामत रक्कम ५०० रूपये कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडे भरणा करावयाची असून शेतकरी सहल प्रत्यक्ष सुरू झाल्यावर भरणा केलेली अनामत रक्कम ५०० रूपये शेतकऱ्यास परत केली जाईल. इच्छुक शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समिती कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)