तळेगाव दाभाडे : ‘‘सामान्य माणसाला सत्तेत बसवणो,सन्मान प्रतिष्ठा मिळवून देणो हे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वपA होते. ते स्वपA पूर्ण करण्यासाठी मी संषर्घ यात्रेव्दारे रस्त्यावर उतरले आहे, ’’ असे प्रतिपादन प्रदेश भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी केले. मावळ येथे एका सभेत त्या बोलत होत्या.
या वेळी भाजपाचे प्रदेश प्रभारी राजीवप्रताप रूडी, खासदार श्रीरंग बारणो, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रूपलेखा ढोरे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुनील शेळके, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, शिवसेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, ालुका प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल, कार्याध्यक्ष लक्ष्मण माने उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यकत करताना त्या म्हणाल्या, दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग या भागात आहे. या भागातील कष्टकरी, कामगार वर्गाने त्यांच्यावर आतोनात प्रेम केले. येथील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची तळमळ त्यांच्या मनात होती. नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून नेले. त्यांनी दिलेला शब्द सत्यात उतरविण्याचा माझा निर्धार आहे’’
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश पिल्ले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)