शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी आज मतदान

By admin | Updated: May 5, 2015 00:49 IST

आठ मतदान केंद्रे : ९९९ मतदार बजाविणार हक्क

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. ९९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, ४१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. संकल्पसिद्धी की सहकार वैभव पॅनेल यामध्ये कोण सरस ठरणार, हे गुरुवारी (दि. ७) स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी मतदान प्रक्रियेसाठी अधिकारी, कर्मचारी वर्ग यंत्रसामग्री व साहित्यासह आठ तालुक्यांतील आठ ठिकाणी कुडाळहून रवाना झाले. प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्ह्यात आठ मतदान केंद्रे असून, यामध्ये कुडाळ (तहसील कार्यालय), कणकवली (जुनी तहसील इमारत), मालवण (तहसील कार्यालय), वैभववाडी (तहसील कार्यालय), सावंतवाडी (मंडल अधिकारी कार्यालय), दोडामार्ग (तहसील कार्यालय पहिला मजला), देवगड (पुरवठा शाखा कार्यालय), वेंगुर्ले (सीआरव्ही टपाल कक्ष नवीन इमारत) यांचा समावेश आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणाऱ्या मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असून, एखाद्याकडे मोबाईल आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. मतदानाविषयी प्रत्येक मतदाराने गुप्तता पाळावी. हे मतदाराचे कर्तव्य असल्याचे रवींंद्र बोंबले यांनी सांगितले. गुरुवारी निकाल सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे भवितव्य ठरविणाऱ्या या निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि. ७) ओरोस येथे जाहीर होत असून, कोण विजयी होणार याबाबत मतदारांबरोबरच जनतेलाही उत्सुकता आहे. यंत्रणा तैनात मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदानासाठी ६० कर्मचाऱ्यांची टीम आठ मतदान केंद्रांत तैनात झाली असून, यामध्ये आठ केंद्राध्यक्ष, प्रत्येक केंद्रावर चार मतदान अधिकारी, शिपाई, दोन पोलीस यांची नियुक्ती केली आहे. ९९९ उमेदवारांची विभागणी एकूण ९९९ मतदार मतदान करणार असून, यामध्ये मालवण १०९, वेंगुर्ले १०३, वैभववाडी ६७, सावंतवाडी २२४, कुडाळ २००, कणकवली १६२, दोडामार्ग ५६, देवगड-७८ उमेदवार आहेत.