शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आदर्शवत निवासी शाळा सुरू करणार; शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी दिली माहिती

By अनंत खं.जाधव | Updated: April 8, 2023 17:56 IST

शिक्षण विभागाचे कामकाज ऑनलाइन होणार

सावंतवाडी :राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आता आदर्शवत निवासी शाळा सुरू केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्गात आंबोली गेळे येथे ५०० विद्यार्थी शमतेची निवासी शाळा लवकरच उभारण्यात येणार आहे. शिक्षण विभागाचे कामकाज ऑनलाइन करण्यात येणार आहे.त्यामुळे शिक्षकांना आता शिक्षणाधिकारी कार्यालयाचे दरवाजे ठोठवावे लागणार नाहीत, अशी माहिती शालेय व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी दिली.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील २० टक्के, ४० टक्के आणि ६० टक्के टप्पा अनुदान वितरित  करताना ज्या शाळा ३१ मार्चपर्यंत काही निकषात बसले नाहीत त्यांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.मंत्री केसरकर हे काल, शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, बाळा जाधव, खरेदी- विक्री संघाचे उपाध्यक्ष रेडकर, सोनुर्ली सरपंच भगवान हिराप भारती मोरे, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत, आदी उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, महाराष्ट्रात सर्व शिक्षण विभागात ऑनलाईन प्रणाली आणली जाणार आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयात जावून कामे करणे आणि शिक्षण विभागाचे दार ठोठावावे लागणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात शाळांना टप्पा अनुदानासाठी ११हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार ज्या शाळा टप्पा अनुदानास पात्र होत्या, त्यांना ३१ मार्चपूर्वी अनुदान वितरित करण्यात आले आहे. मात्र, काही शाळांना त्रुटींसाठी  दुरुस्ती करून येत्या ३० एप्रिलपर्यंत टप्पा अनुदान वितरीत करण्याचा दृष्टिने शिक्षण विभागाला सूचना दिल्या आहेत. कुठलीही शाळा टप्पा अनुदानापासून वंचित राहणार नाही, काही त्रुटी असतील त्या दूर केल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर