शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी धरणग्रस्त संघर्ष समितीत फूट

By admin | Updated: August 28, 2014 22:24 IST

संजय नाईक : कामात हलगर्जीपणाची टीका

दोडामार्ग : तिलारी धरणग्रस्त बेरोजगार संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत गवस हे आपल्या कामात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप समितीचे सचिव संजय नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे. समीतीतील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही पत्रकातून नाईक यांनी केली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या या समितीतच आता फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोडामार्ग तालुुक्यातील तिलारी धरणबाधित गावातील दाखलाधारकांस घरटी नोकरी देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. याची अंमलबजावणी न झाल्यामुळे या भागातील प्रकल्पबाधित बांधवानी एकत्र येत संघर्ष समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी गेल्या काही वर्षांपासून शशिकांत गणपत गवस आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली दोन ते तीन वेळा मोठी आंदोलने करण्यात आली. शासनस्तरावरून या आंदोलनांची दखलही घेण्यात आली. यात महत्त्वाचे म्हणजे गत महिन्यात तिलारी येथे झालेल्या आंदोलनानंतर धरणग्रस्तांचा वनटाईम सेटलमेंटचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत प्रत्येक दाखलाधारकास पाच लाख रुपये देण्याचे ठरविण्यातही आले. या सर्वाचा अध्यादेश काढण्यासाठी अध्यक्षांनी मुंबई येथे जाणे आवश्यक होते. तरच १९ आॅगस्टपूर्वी हा अध्यादेश मिळण्याची व चतुर्थीपूर्वी रक्कम मिळण्याची आशा होती. मात्र, या सर्व प्रक्रियेत अध्यक्ष शशिकांत गवस हे निष्काळजीपणे वागले, असा आरोप सचिव नाईक यांनी केला आहे. संघटना कुणा एकट्यावर चालत नाही. याचा विचारही त्यांनी करावा, असे नाईक यांनी म्हटले आहे.आपण या भूमिकेपर्यंत पोहोचण्यासाठी धरणग्रस्तांच्या भावना कारणीभूत आहेत. प्रत्येक धरणग्रस्ताला उत्तर देताना तोंडघशी पडल्यासारखे होत आहे. या सर्व प्रकारात समितीच्या अध्यक्षांचा दोष आहे, असा आरोप करून राजीनाम्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)