शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

तिलारी जंगल वन्य प्राण्यांचे माहेरघर

By admin | Updated: March 22, 2015 00:28 IST

विविध प्राण्यांचे अस्तित्व कॅमेऱ्यात कैद : आंबोलीलाही वन्य प्राण्यांची पसंती

अनंत जाधव / सावंतवाडी पश्चिम घाटात येत असलेल्या आंबोलीपासून तिलारीपर्यंतच्या जंगलात सध्या वेगवेगळ्या प्राण्यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहे. या पट्ट्यात पट्टेरी वाघाच्या पाऊल खुणांबरोबरच वेगवेगळे प्राणी दृष्टीस पडत आहेत. तिलारीच्या जंगलातील मुबलक पाणीसाठा तसेच तीन राज्यांचे मिळून असलेले घनदाट जंगल यामुळे बहुतांश प्राण्यांचे तिलारीचे जंगल माहेरघरच ठरत आहे. मध्यंतरी वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात हे सिद्ध झाले आहे. माणगाव खोऱ्यात पकडण्यात आलेल्या तीन हत्तींना प्रशिक्षित केल्यानंतर त्यांना तिलारीच्या जंगलात ठेवण्याचा वनविभागाचा प्रस्ताव होता. मात्र, दोडामार्ग तालुक्यात या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. याच तिलारीत अनेक प्राण्यांच्या पाऊलखुणा सध्या आढळून आल्या आहेत. वनविभागाने आॅगस्ट २०१४ मध्ये सिंधुदुर्गमधील काही जंगलात कॅमेरे लावले होते. या कॅमेऱ्यामध्ये प्राण्यांच्या पाऊलखुणा आढळल्या. यातील जास्तीत जास्त प्राणी हे आंबोली व तिलारीतील केंद्रेच्या जंगलात आढळून आले आहेत. आंबोली व तिलारी पश्चिम घाटात येत असून सह्याद्रीच्या पायथ्याचा भाग म्हणून हा परिसर ओळखला जातो. या परिसरातच मोठ्या प्रमाणात मायनिंग तसेच पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प शासनाने मंजूर केले आहेत. मात्र, हा परिसर इको-सेन्सिटिव्हमध्ये येत असल्याने हे प्रकल्प कागदावरच असून प्रत्यक्षात कृतीत उतरले नाहीत. जर हे प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाले तर अनेक औषधी वनस्पती तसेच वन्य प्राणी नाहिसे होणार आहेत. तिलारी, आंबोली जंगलात राहणारे वन्यप्राणी खाद्य मिळविण्यासाठी मानवी वस्तीत येत असतात. त्यामुळे या प्राण्यांसाठी जंगलातच त्यांच्या खाद्याची सोय केल्यास ते वस्तीत येणार नाहीत.