शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: June 23, 2015 00:29 IST

सोनाळीत घरफोडी : सावंतवाडीत सुवर्णकारांची दुकाने फोडली

वैभववाडी : सोनाळी वाणीवाडी येथील संतोष राजाराम शिरावडेकर यांचे भर दिवसा घर फोडून रोख रकमेसह सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. त्यामध्ये ३२ हजारांची रोकड आणि साडेपाच तोळे सोन्याचा समावेश आहे. दुपारी १ ते २ या तासाभराच्या कालावधीत चोरीची घटना घडली. दरम्यान, सावंतवाडीतील दोन सुवर्णकारांची दुकानेही चोरट्यांनी फोडली. यामध्ये सुवर्णकारांची दोन किलो चांदी लंपास केली आहे. संतोष शिरावडेकर यांची पत्नी घरच्या दरवाजाला कुलूप लावून कपड्यांना शिलाई करण्यासाठी शेजारी गेली होती. दुपारी दोनच्या सुमारास घरात आल्या तेव्हा पाठीमागचे दोन्ही दरवाजे उघडे आढळल्याने तिने फोन करून वैभववाडीतून संतोषला बोलावून घेऊन घरात पाहिले असता देवखोलीसह लगतच्या खोलीतील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. देवखोलीच्या बाजूच्या खोलीतील पत्र्याच्या दोन्ही पेट्या फोडून रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.चोरट्याने मागचा दरवाजा धक्का मारून उघडल्यानंतर कटावणीने मधल्या दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. संतोषच्या वडिलांनी बैल (पान ५वर) (पान १वरून) विकून मिळालेले आणि घरखर्चाचे असे ३२ हजार रुपये पेटीत ठेवले होते. ते गणेशमूर्तींना रंगकाम करून विक्रीचा व्यवसाय करतात. हे पैसे घेऊन संतोष गुरुवारी गणेशमूर्ती खरेदीसाठी कोल्हापूरला जाणार होता, तर त्याच्या आईची सोन्याची माळ, कुडी, वडिलांच्या दोन अंगठ्या असे सुमारे साडेपाच तोळे सोने चोरट्याने लंपास केल्याचे कळताच संतोषच्या आई-वडिलांना धक्का बसला.आजूबाजूस घरे असताना रस्त्यालगतच्या घरात भरदिवसा चोरी झाल्याने तेथील लोक चांगलेच धास्तावले आहेत. गेल्या पाच दिवसांतील दिवसा घरफोडीची, तर दहा दिवसांतील मोठ्या चोरीची तिसरी घटना आहे. (प्रतिनिधी)सावंतवाडीत खळबळसावंतवाडी शहरात चोरीचे सत्र सुरूच असून, रविवारी मध्यरात्री शहरातील उभाबाजार येथील दोन सुवर्णकारांची दुकाने फोडली. त्यातील बाळकृष्ण अरविंद मठकर (सावंतवाडी) यांच्या दुकानातून दोन किलो चांदीचे दागिने लंपास केले. तर त्यांच्या शेजारी असलेल्या मनीष पावस्कर यांचे दुकानही फोडण्याचा प्रयत्न केला, पण चोरांना यश आले नाही. या घटनेने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.