शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

राज्याच्या सीमेवरील गावाचे तीन-तेरा

By admin | Updated: June 30, 2016 23:40 IST

गड-किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर : प्रशासनासह पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष; सडा गावाची उपेक्षा कायम

वैभव साळकर -- दोडामार्ग  इतिहासाची साक्ष देत मांगेलीच्या सीमेवर उभा असलेला ‘‘सडा’’ गाव महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावादात अडकला आहे. मूळ कर्नाटक राज्यात जरी हा गाव असला तरी विविध कारणांमुळे या गावचे नाते महाराष्ट्राशी जोडले गेले आहे. कर्नाटक सरकारच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या दुर्लक्षामुळे सडावासीय विकासापासून वंचीत आहेत. शिक्षण आरोग्य व दळणवळणाच्या प्राथमिक सुविधा या गावापासून कोसो दूरच आहेत. साधारणत: पाचशे वर्षापूर्वीच्या इतिहासाची साक्ष देत या ठिकाणी उभ्या असलेल्या गड किल्ल्याच्या संवर्धनाकडेही पुरातत्व विभाग आणि पर्यायाने केंद्र शासनानेही दुर्लक्ष केल्याने ते ढासळत चालले असून भविष्यात नामशेष होण्याची भिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या सीमेवर सडा गाव वसला आहे. चहूबाजूंनी घनदाट जंगल, गावात जायला मातीचा कच्चा रस्ता, शिक्षणाच्या सोयीचा अभाव, आरोग्याच्यादृष्टीने एखादा दवाखाना तर फारच दूर अशी अत्यंत गैरसोयींनी आणि सोयीसुविधांचा अभाव असलेला गाव म्हणून सडा गावचे वर्णन केल्यास ते वावगे ठरणार नाही. जसे या गावची ओळख मागासलेपण ही आहे याहीपेक्षा या गावाला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. गावच्या परिसरात ठिकठिकाणी त्याचे दाखले सापडतात. गावात एका डोंगराच्या कड्यावर उंच भागात गड आणि चिरेबंदी राजवाडा आहे. शिवाय आजूबाजूला शत्रूपासून रक्षण करण्याकरिता टेहळणी करण्यासाठी बांधलेले बुरूज तर आजही पाहावयाच मिळतात. या किल्ल्यावर व राजवाड्यावर लोखंडी तोफ आजही जशाच तशी असून ग्रामस्थ त्याची पूजा करतात. गावात एकूण साठ विहिरी आहेत. गावच्या मधोमध असलेली विहिर वर्षाचे बाराही महिने गावकऱ्यांची तहान भागवते. एका बाजुला भुयारी मार्ग असून तो कुठे याचे अजूनही गुपीत कायम आहे. या गावच्या कोपऱ्या कोपऱ्यात इतिहास ठासून भरला आहे. ठिकठिकाणी अनेक पुरातन वास्तू आहेत. ज्या हा इतिहास उलघडण्यासाठी खुणावत आहेत. परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमा वादामुळे इतिहासाची पाने उलघडण्याबाबत संशोधन झालेले नाही. पुरानत्व विभागही याकडे आजपर्यंत तरी कानाडोळा करून आहेत. या गावचा इतिहास फारचा कोणास ठाऊक नाही. मात्र जाणकार व्यक्तींच्या सांगण्यानुसार कदंब राजवटीत विजापूरच्या आदीलशाहीने गोव्यातील कदंब राजवटीवर आक्रमण केले होते. त्यावेळी देसाई सरदार संरक्षणासाठी उंच अशा सह्याद्री डोंगर रांगाच्या माथ्यावर आला आणि त्याठिकाणी गाव वसवला होता, असे सांगितले जाते. मात्र तरी परिपूर्ण इतिहास कोणालाच माहित नाही. गावात एकाच पाषाणी दगडात साकारलेले राई पांडुरंग रखुमाई देवाचे मंदिर आहे. जे इ. स. १७१२ मध्ये स्थापन केल्याचा पुरावा याठिकाणी आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे हा गाव इतिहासाचा साक्षीदार असताना सुद्धा विकासापासून वंचित आहे. मांगेलीपासून अवघ्या एक किलोमीटरवर सडा वसला आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी या गावचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. जेमतेम पन्नास घरे आहेत. मराठी आणि कोकणीही बोली भाषा या ठिकाणी बोलली जाते. जरी कर्नाटक राज्यात गाव वसले तरी मांगेलीमार्गे साटेली- भेडशीचा बाजारच त्यांना अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे बाजारासाठी हे लोक साटेली भेडशीत येतात. शिक्षणाची गावात सोय नसल्याने मांगेलीत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी साटेली भेडशी किंवा दोडामार्गच्याठिकाणी विद्यार्थी येतात. रोजगारासाठी बहुतांशी तरूण गोव्यात काम धंद्यासाठी जातात. पुरातत्व विभागले तर पूर्णत: डोळेझाक केल्याने इथले किल्ले, राजवाडा आणि बुरूज ढासळीत चालले आहेत. भविष्यात ही परिस्थिती अशीच राहील्यास इतिहासाची हे साक्षीदार नामशेष होण्याची भिती आहे.पावसाळ्यानंतर सड्याच्या पठारावरही सौंदर्य पहावयास मिळेलसडा जसा इतिहासाचा साक्षीदार आहे. तसाच नैसर्गिक साधन संपत्तीनेही भरलेला आहे. इथले किल्ले, राजवाडे, गावात असलेल्या विहिरी, विवरे आदींचा अभ्यास व त्यावर संशोधन झाल्यास पर्यटनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील कासच्या पठारावर जसे सौंदर्य पाहायला मिळते अगदी तसेच नैसर्गिक सौंदर्य व विविध रंगबेरंगी फुलांचा महोत्सव पावसाळ्यानंतर सड्याच्या पठारावरही पहावयास मिळतो.