शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीन शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद

By admin | Updated: April 12, 2015 23:58 IST

जिल्हा परिषद : प्रशासनाची नामुष्की; शिक्षण विभागासाठी धोक्याची घंटा

गिरीष परब - सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद (जि.प.) शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पोषण आहार, पाठ्यपुस्तके आदी सुविधा उपलब्ध असतानाही या चालू शैक्षणिक वर्षात जिपच्या तीन शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद करण्याची नामुष्की जिल्हा परिषद प्रशासनावर ओढवली आहे. सतत घटत जाणारी पटसंख्या परिणामी बंद पडत चाललेल्या शाळा या गोष्टी मात्र शिक्षण विभागासाठी ‘धोक्याची घंटा’ बनली आहे.शैक्षणिक विकासासाठी सक्तीचे शिक्षण हा कायदा करण्यात आला. त्या अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षण आवश्यक व मोफत केले आहे. त्यासोबत मोफत गणवेश, वह्या, पुस्तके, मोफत शिक्षण त्याचबरोबर अन्य काही सवलती देण्यात आल्या असूनदेखील पटसंख्याअभावी जिपच्या शाळा बंद करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे. शिक्षणासाठी कोट्यवधी रुपये निधी खर्च करूनही शाळेतील मुलांची पटसंख्या व शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा सुधारत नसल्याची स्थिती सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची झाली आहे.चालू शैक्षणिक वर्षात सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या १४७० शाळा होत्या. त्यात मालवण तालुक्यातील तीन शाळा या विद्यार्थ्यांअभावी बंद कराव्या लागल्यात. त्यामुळे सद्यस्थितीत जिपच्या शाळांची संख्या ही १४६७ एवढी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी पदाधिकारी तसेच अधिकारीदेखील प्रयत्नशील आहेत. नवनवीन योजना, विद्यार्थ्यांच्या गणवेशात बदल, बेंचेस पुरविणे, ई-लर्निंग शिक्षण, ब्लॅकबोर्ड पुरविणे, पाण्याची सोय आदी योजना राबविण्याचा प्रयत्न करताहेत मात्र असे असूनसुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी जात नसल्यामुळे शाळा या बंद कराव्या लागत आहेत.धोक्याची सूचनासर्व शासकीय योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी होऊनदेखील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांकडे वळण्यास, प्रवेश घेण्यास का इच्छुक नाहीत? याचा सखोल अभ्यास करण्याची वेळ आता सिंधुदुर्गच्या प्राथमिक शिक्षण विभागावर येवून ठेपली आहे. पटसंख्येअभावी बंद पडत चाललेल्या शाळा या शिक्षण विभागासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. वर्षानुवर्षे खासगी शाळांच्या पटसंख्येमध्ये वाढ होत आहे. पालक आपल्या मुलांना खासगी तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे प्रवेश घेत आहेत. खासगी शाळांची जर जिल्हा परिषद शाळांना बरोबरी करायची असेल तर प्रथमत: तज्ज्ञ इंग्रजी शिक्षकांची पदे भरली जाणे आवश्यक आहेत. तरच पटसंख्या वाढू शकते.शाळा बंद होण्याची कारणेशाळा बंद होण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता प्रथमदर्शी असे निदर्शनास आले की, खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढला. सिंधुदुर्गची लोकसंख्येत २०११ च्या जनगणनेनुसार २० हजारांनी घट झाली आहे. शैक्षणिक दर्जा खालावत चालल्यामुळे पालक आपल्या मुलांना खासगी शाळांकडे प्रवेश देत असल्याचे बोलले जात आहे.उपाययोजना करणे आवश्यकजिल्ह्यात शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी अधिकारी, पदाधिकारी यांची संयुक्तरित्या समिती स्थापन करणे आवश्यक आहे. या समितीमार्फत शाळांची तपासणी होणे आवश्यक आहे. शिक्षक हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळांमध्ये १० निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. इंग्रजी पदवीधर शिक्षकांची पदे भरणे आवश्यक आहे.३२२ शाळांवर टांगती तलवारसिंधुदुर्गात १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या ही ५०, १०० नव्हे, तर तब्बल ३२२ एवढी आहे. त्यात यापैकी निम्म्या शाळांमध्ये ५ पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा असण्याची शक्यता आहे. यामुळे ही अशीच घटत जाणारी पटसंख्या असल्यास आगामी काळात या शाळाही पटसंख्येअभावी बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवण्याची शक्यता आहे.