शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारच्या तिसऱ्या टप्प्याचा आराखडा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३७ गावांमधील ८०० कामांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 15:38 IST

सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत राज्याच्या मृद् व जलसंधारण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला १४ कोटी ४१ लाख ५३ हजार एवढ्या निधीची आवश्यकता आहे. एवढ्या खर्चाच्या आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देपुरळ, शिरशिंगे गावांनी नाकारली योजना, साडेचौदा कोटींच्या निधीची गरजतिसऱ्या टप्प्यासाठी जलयुक्त शिवार अभियानामध्ये ३७ गावे समावेश लघुसिंचनासाठी ६ कामे प्रस्तावित

सिंधुदुर्गनगरी : सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत राज्याच्या मृद् व जलसंधारण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला १४ कोटी ४१ लाख ५३ हजार एवढ्या निधीची आवश्यकता आहे. एवढ्या खर्चाच्या आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

८०० कामे यात अंतर्भूत करण्यात आली आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी एकूण ३९ गावांची निवड करण्यात आली होती. यातील देवगड-पुरळ व सावंतवाडी-शिरशिंगे या गावांनी ग्रामसभेद्वारे ही योजना नाकारल्याने ३७ गावे तिसऱ्या टप्प्यासाठी समावेशित करण्यात आली आहेत.

राज्य शासनाने २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार ही योजना अमलात आणली आहे. पहिल्याच वर्षी ३५ गावांचा यात समावेश करण्यात आला होता. ५९७ कामांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यातील ४९४ कामे पूर्ण होऊन १७ कोटी ३९ लाख २८ हजार एवढा निधी खर्च पडला होता.

२०१६-१७ साठी २३ गावांची निवड करण्यात आली होती. २७२ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यातील २६९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. २३८ कामे सुरू झाली असून २०६ कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी आतापर्यंत ५ कोटी ९१ लाख ७३ हजार रुपये एवढा खर्च झाला आहे.

२०१७-१८ या तिसऱ्या टप्प्यासाठी ३७ गावांचा जलयुक्त शिवार अभियानामध्ये समावेश करून त्यांच्या कामांचे आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. देवगड तालुक्यातील नाडण, धालवली, सौंदाळे, वैभववाडी तालुक्यातील नावळे, पालांडेवाडी, कणकवली तालुक्यातील कळसुली, हरकुळ-बुद्रुक, नाटळ, भिरवंडे, ओसरगाव, हळवल, मालवण तालुक्यातील किर्लोस, असगणी, कुंभारमाठ, तिरवडे, साळेल, कुडाळ तालुक्यातील आंजिवडे, पोखरण, कसबे, पिंगुळी, कुसगाव, नेरूर तर्फ हवेली, अणाव, वेंगुर्ला तालुक्यातील आडेली, भंडारवाडा, गवाणे यांचा समावेश आहे.

तर सावंतवाडी तालुक्यातील सांगेली, सावरवाडा, बांदा, चौकुळ, कोनशी, दाभोळ व दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे, आयनोडे, घाटीवडे, खानयाळे, झोळंबे या गावांचा तालुकानिहाय जलयुक्त शिवारच्या तिसऱ्या टप्प्यासाठी समावेश करण्यात आला आहे. पाणलोटमध्ये समावेशित असलेल्या व गेल्या पाच वर्षांत एकदातरी पाणीटंचाई घोषित झालेल्या गावांचा तिसऱ्या टप्प्यासाठी समावेश करण्यात आला आहे.

तिसऱ्या टप्प्यात समावेशित ३७ गावांच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. एकूण ८०० कामे निवडण्यात आली आहेत. यासाठी १४ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपये निधी लागणार आहे. ही कामे विविध विभागांच्यावतीने करण्यात येणार आहेत.अंमलबजावणी यंत्रणा असलेल्या राज्य शासन कृषी विभागाच्यावतीने ६६८ कामे करण्यात येणार असून यासाठी त्यांना ६ कोटी ४८ लाख ५८ हजार एवढा निधी लागणार आहे.

सामाजिक वनीकरण विभाग ८ कामे करणार आहे. त्यांना एक कोटी ९७ लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. वन विभागाकडे ३५ कामे देण्यात आली असून ४२ लाख ७७ हजार रुपये एवढा निधी लागणार आहे.

लघुसिंचनासाठी ६ कामे प्रस्तावितलघुसिंचनासाठी जलसंधारण विभागाकडे ६ कामे देण्यात आली आहेत. याकरिता या विभागाला एक कोटी ९० लाख रुपये निधी लागणार आहे. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडे ५५ कामे देण्यात आली असून याकरिता ४ कोटी ९१ हजार रुपये निधी लागणार आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे २८ कामे देण्यात आली आहेत. त्यांना एक कोटी ५७ लाख ३० हजार रुपये एवढा निधी लागणार आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारsindhudurgसिंधुदुर्ग