शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ते प्रसिद्धीची हौस भागवून घेताहेत : अतुल काळसेकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 10:49 IST

किसान क्रेडिट कार्ड योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वर्धापन दिनापासून राबविणार अशी घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक वर्धापन दिन सोहळा एकमेकांना जोडून सतीश सावंत आपली प्रसिद्धीची हौस पुरवून घेत आहेत, अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपा नेते अतुल काळसेकर यांनी केली.

ठळक मुद्देते प्रसिद्धीची हौस भागवून घेताहेत : अतुल काळसेकर  सतीश सावंत यांच्यावर किसान क्रेडिट कार्डबाबत टीका

कणकवली : किसान क्रेडिट कार्ड योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वर्धापन दिनापासून राबविणार अशी घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक वर्धापन दिन सोहळा एकमेकांना जोडून सतीश सावंत आपली प्रसिद्धीची हौस पुरवून घेत आहेत, अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपा नेते अतुल काळसेकर यांनी केली.किसान क्रेडिट कार्डमधून मच्छिमार, शेळीमेंढी पालन करणारे व्यावसायिक, दुग्ध व्यावसायिक यांना जिल्हा बँकेच्या वर्धापन दिनापासून कर्जपुरवठा केला जाईल असे सतीश सावंत यांनी जाहीर केले आहे. त्यावरून काळसेकर यांनी सावंत यांच्यावर टीका केली. कणकवली येथील भाजपा संपर्क कार्यालयात ते बोलत होते़ यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, महेश सारंग, अमोल तेली आदी उपस्थित होते.अतुल काळसेकर म्हणाले, किसान क्रेडिट कार्ड योजना ही केंद्राची योजना आहे. सर्वसामान्यांसाठी असलेल्या विविध विमा योजना, शेतकऱ्यांसाठीची पंजाबराव देशमुख कृषी योजना, पीक विमा कर्ज योजना या सर्व केंद्र सरकारच्याच योजना असून त्या किसान क्रेडिट कार्डमध्ये अंतर्भूत केल्या आहेत.जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी केंद्राच्याच योजना राबवित आहे. या योजनांमधून सात टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. या सात टक्क्यांतूनही तीन टक्के केंद्र सरकारच्या वाट्याचे व्याज केंद्र सरकारने माफ करून शेतकºयांना कसा अधिक दिलासा मिळेल हे पाहिले आहे.जिल्हा बँकेचा एक टक्का सोडला, तर राज्याचे तीन टक्के व्याज शिल्लक राहतेच. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सत्ताधारी तिघाडी राज्य सरकारचे प्रतिनिधी आहेतच. तेव्हा हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या राज्यसरकारकडून तीन टक्के व्याज माफ करून दाखवावे. शेतकऱ्यांना त्यातून आवश्यक दिलासा नक्कीच मिळेल.शेतकºयांसाठी काहीच न करणाऱ्या राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाचा पैसा द्यायचा आणि आज सर्व योजना ज्या केंद्राच्या पैशातून बँक राबवित आहे, त्या केंद्राच्या पीएम केअरला मदत नाकारायची ही उफराटी विश्वासघातकी रित, हीच सावंत यांची संस्कृती आहे. केवळ राज्य सरकारला खूष करीत राजकीय मलिदा लाटण्यासाठी सतीश सावंत जिल्हा बँकेचा गैरवापर करीत आहेत, अशी टीकाही अतुल काळसेकर यांनी केली आहे....तर काजू उत्पादकांना आधार मिळाला असताशेतकऱ्यांचा कैवारी म्हणून मिरवणारे सतीश सावंत हे पत्रकार परिषदा घेण्याव्यतिरिक्त काहीही करीत नाहीत. काजू व्यावसायिकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावरही त्यांनी निव्वळ राजकारण आणि पत्रकबाजीच केली. फडणवीस सरकारच्या काळात काजूसाठी मंजूर झालेले शंभर कोटी रुपये मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या राज्य सरकारकडे प्रयत्न केले असते, तर काजू उत्पादक शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळात मोठा आधार मिळाला असता, असेही काळसेकर म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणAtul Kalsekarअतुल काळसेकरsindhudurgसिंधुदुर्ग