शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखडा सादर न करणाऱ्या ग्रामपंचायतींना एकही पैसा देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 23:39 IST

कमलाकर रणदिवे : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत माहिती

सिंधुदुर्गनगरी : १५ आॅगस्टपूर्वी गावचा विकास आराखडा सादर न करणाऱ्या एकाही ग्रामपंचायतीला यापुढे १४ व्या वित्त आयोगातून एकही पैसा दिला जाणार नसल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली. तसेच सन २०१४-१५ चे आॅडिट व ग्रामपंचायतीचे उत्पन्न न वाढविणाऱ्या ग्रामपंचायतींचा यात समावेश होणार आहे.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिक सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, विषय समिती सभापती दिलीप रावराणे, अंकुश जाधव, रत्नप्रभा वळंजू, आत्माराम पालेकर, सदस्य सतीश सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, प्रमोद कामत, रणजित देसाई, वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, पुष्पा नेवरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.१४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात युती शासनाने ग्रामपंचायतींवर काही जबाबदाऱ्यांही ठरवून दिल्या आहेत. त्यानुसार या वित्त आयोगाचे दोन हप्ते सर्व ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आले आहेत. मात्र यानंतरचा निधी शासनाच्या अटी व नियमांचे पूर्तता केल्यानंतरच ग्रामपंचायतींना मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतींनी आपले सन २०१४-१५ चे लेखा परीक्षणे पूर्ण करून घ्यावीत. कामांचा आराखडा १५ आॅगस्टपूर्वी करावा. तसेच ग्रामपंचायतींनी आपले उत्पन्न वाढविले तरच हा पुढील म्हणजेच तिसरा हप्ता मिळणार असल्याचे शासनाने स्पष्ट केल्याची माहिती देण्यात आली.जिल्ह्यात नादुरुस्त शाळांचा मोठा प्रश्न ऐरणीवर असून लाकडी छप्पराच्या शाळा दुरुस्ती करणे कठीण आहेत. म्हणून यापुढे अशा शाळांना लोखंडी छप्पर करण्यासाठी नियोजन समितीकडे प्रस्ताव द्या याबाबत सतीश सावंत यांनी सूचना मांडली.जिल्ह्यातील नद्यानाल्यांचे पाणी आटले आहे. त्यामुळे पाणीटंचाईची झळ सर्वच ठिकाणी भासू लागली आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या कामांचे १०० प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. मात्र यापैकी केवळ पाच प्रस्तावांनाच मान्यता दिल्याने सभागृहात आश्चर्य व्यक्त करण्यात आले.याबाबत गटनेते सतीश सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत नाराजीही व्यक्त केली. याबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी अशाही सूचना या सभागृहाने केल्या. दुर्धर आजारामधील ४६ बालकांपैकी २१ जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत दिली. (प्रतिनिधी) पाणलोट कामाची पाहणी करुन चौकशी करा पाणलोट योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी तसेच निधी प्राप्त किती? खर्च किती? कोणती व कोठे कामे घेण्यात आली. याबाबतची माहिती राज्य कृषी अधीक्षक विभागाकडून मिळत नाही असा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार सुरु असलेल्या कामांंची चौकशी करण्याची मागणी सर्व सदस्यांनी केली. तसेच पाणलोटच्या कामाची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश उपाध्यक्ष नाडकर्णी यांनी दिले.