शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

आठवडा बाजारवर नियंत्रण नसल्याने संताप

By admin | Updated: July 11, 2015 00:17 IST

ग्राहकांना फटका : जैतापूरचा बाजार महाग, जाहीर झालेली समिती नियुक्तच नाही

जैतापूर : जैतापूर (ता. राजापूर) ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील आठवडा बाजारच महाग झाला आहे. विक्रेत्यांच्या दरावर कोणाचेही नियंत्रण नाही. परिणामी याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.आठवडा बाजारामध्ये कोल्हापूर राधानगरी या भागातून येणारे व्यापारी अव्वाच्या सव्वा दराने भाजी विक्री करत आहेत. शेजारच्या नाटे गावामध्ये जैतापूरपेक्षा कमी दरात भाजी मिळत असल्याने जैतापूरवासीय नाटे गावातून भाजी विकत आणत आहेत.जैतापूर आठवडा बाजाराच्या माध्यमातून जैतापूर ग्रामपंचायतीला वर्षाकाठी ७० हजार ते ७५ हजारापर्यंत महसूल मिळत आहे. विक्रेत्यांवर दरासंदर्भात जैतापूर ग्रामपंचायतीमध्ये समिती नेमण्याचे ठरले होते. ती समिती काम करते का? याबाबत लोकमतने जैतापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांची भेट घेतली असता अद्याप समिती तयार केली नसल्याचे त्यांनी सांगितले. उपसरपंचांच्या दुकानासमोरच हा बाजार भरवण्यात येतो. जेव्हा लोकमतने या वृत्ताची दखल घेताच भाजी विक्रेत्यांनी पावकिलोच्या किमतीमध्ये सरासरी पाच रुपयांची घसरण केली. ही बाब उपसरपंचांच्या कानावर घालण्यात आली. येथे येणारे बहुतांश व्यापारी तपासणी न केलेल्या तराजूमध्ये मोजमाप करत असल्याने काटा मारणे, हा प्रकारदेखील होत आहे. पॅकिंग केलेली साखर, कडधान्य, चहापावडर, मसाले यांच्या वजनात घट असल्याचे ग्राहक सांगतात. परिणामी काही व्यापारी आपल्या किलोमागे दोन रुपये दर कमी केल्याचे सांगून ग्राहकांकडून सहानुभूती मिळवतात आणि त्यांची लूटही करतात. हा प्रकार येथील आठवडा बाजारात सर्रासपणे अनुभवास येतो. (वार्ताहर)