शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

तपासात प्रगती नाही

By admin | Updated: April 1, 2015 00:09 IST

पेढीतील चोरी : खेड शहरात नागरिकांमध्ये घबराट

खेड : खेड शहरातील संजय दत्तात्रय दांडेकर या सराफी दुकानात खरेदीस गेलेल्या ग्राहकाच्या पिशवीतील ७० हजार रूपये किंमतीचे दागीने चोरीस गेल्याप्रकरणी अद्याप तपासात गती मिळाली नाही़ पोलिसांनी तातडीने तपास करणे आवश्यक असतानाच चोरी झाल्याची माहिती मिळताच कोणतीही तत्परता दाखवली नसल्याने ‘त्या’ संशयित ४ महिला निसटून गेल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान वारंवार होत असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी आता महिलांना असुरक्षितता वाटत असून खेड पोलिसांनी आपली कार्यक्षमता सिध्द करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान या चोरीबाबत सोमवारी खतिजा आपली फिर्याद दाखल करण्यास गेल्या असता त्यांनी तातडीने ती दाखल न करता उशिरा दाखल करून घेतल्याचे समजते.सोमवारी खेड शहरातील सोनारआळी येथील संजय दत्तात्रय दांडेकर यांच्या दुकानामध्ये जुने सोन्याचे दागिने देऊन नवे सोन्याचे दागीने खरेदी करण्याच्या हेतूने आलेली महिला ग्राहक खतिजा लियाकत देशमुख (वय ४५ रा़ खेड) या दुकानाच्या काउंटरसमोर उभ्या होत्या़ याचवेळी ५ तोळे सोन्याचे दागिने त्यांनी आपल्यासोबत आणले होते़ यामध्ये १ तोळे वजनाच्या २ सोन्याच्या बांगड्या, १ तोळे वजनाचे ५ कानातील जोड, १ तोळे वजनाचे ५ सोन्याची रिंग, १ ग्रॅम वजनाची खडयाची कुडी, २ ग्रॅम वजनाची अंगठी आणि सोन्याची १ चेन असा ५ तोळयांचा ७० हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज खतिजा यांनी आपल्यासोबत आणला होता. यावेळी दांडेकर यांच्याशी ‘त्या’ चर्चा करीत असतानाच दांडेकर यांना दागीने दाखवण्यासाठी त्यांनी आपल्या हातातील पिशवीतून जुने दागिने काढण्याचा प्रयत्न केला असता, दागिने ठेवलेली लहान पर्स गायब झालेली आढळून आली़ त्यांनी लागलीच दांडेकर यांना ही बाब सांगितली. तेथील सर्व लोकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, तो निरर्थक ठरला़ मात्र त्यावेळी काउंटरसमोर अन्य ४ महिला उभ्या असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याने त्यांच्या शोधार्थ पोलिसांनी आपली तपासाची दिशा वळवल्याचे समजते. दरम्यान ज्याप्रकारे ही चोरी झाली त्या प्रकारे पोलिसांनीही तत्परता दाखवणे आवष्यक होते. मात्र, तसे झाले नाही़ यामुळेच चोरट्या महिलांना उत्तेजन मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी चार महिला खेड बसस्थानक परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. मात्र ही चोरी त्यांनीच केली अथवा नाही, हे स्पष्ट झालेले नाही.