शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाईसाहेब स्मारकासाठी शासकीय जागाच नाही

By admin | Updated: November 18, 2015 00:05 IST

तहसीलदारांचा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल : स्मारक सावंतवाडीऐवजी माजगाव येथेच करावे लागणार

अनंत जाधव - सावंतवाडी  माजीमंत्री भाईसाहेब सावंत यांचे स्मारक दोन एकर जागेत सावंतवाडी शहरात करण्यात यावे, अशी सूचना राज्याचे अप्पर मुख्य सचिव पी. एस. मीना यांनी केली होती. मात्र, एवढी मोठी शासकीय जागा शहरात नसल्याचा अहवाल येथील तहसीलदार विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला असून, भाईसाहेब सावंत यांचे स्मारक आता माजगाव येथेच करावे लागणार आहे. तशी इच्छा विकास सावंत यांनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे.सिंधुदुर्गमध्ये मंत्रीमडळ बैठक झाली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. यावेळी जाहीर केलेल्या कोकण पॅकेजमध्ये तशी तरतूदही केली होती. मात्र, गेली ९ वर्षे या स्मारकासाठी जागा हस्तांतरण करण्यात आली नाही. माजगाव येथेच स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी भाईसाहेब सावंत कुटुंबीयांनी केली होती. त्यासाठी जागाही देऊ केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत या जागेचे हस्तांतरण झाले नाही.दरम्यान, अलिकडेच जिल्हा दौऱ्यावर आलेले अप्पर मुख्य सचिव पी. एस. मीना यांनी भाईसाहेब सावंत यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी कोकणच्या विकासात मोलाचा वाटा उचलला असून, त्यांचे स्मारक भव्य-दिव्य झाले पाहिजे. त्यासाठी शहरात दोन एकर शासकीय जागा शोधण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना दिले होते.अप्पर मुख्य सचिवांनी या स्मारकात व्यक्तीश: लक्ष घालून या जागेत हॉल, कॉम्प्युटर लॅब, वाचनालय आदींची तरतूद आराखाड्यात करण्याचे सुचविले होते. येथील प्रशासनाने या स्मारकासाठी खास जागा शोधण्याचे काम सुरू केले होते. मात्र, या ठिकाणी एकही शासकीय जागा नसून, काही जागा शिल्लक आहेत; मात्र या जागांवर देवराई तसेच स्मशानभूमीची आरक्षणे असल्याचे पुढे आले आहे. या व्यतिरिक्त सावंतवाडीवाडी शहरात एकही जागा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.तहसीलदारांनी तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला असून, या अहवालात जागा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे स्मारक भाईसाहेब सावंत कुटुंबाच्या मागणीनुसार माजगाव येथेच उभारावे लागणार आहे. सावंत कुटुंबाने आहे त्यापेक्षा जास्त जागा देण्याचेही मान्य केले आहे. त्यांची तशी चर्चाही प्रशासनाशी झाल्याचे तहसीलदार बी. बी. जाधव यांनी सांगितले. त्यामुळे आता प्रशासनाची इच्छा असली, तरी भाईसाहेब सावंत यांचे स्मारक सावंतवाडी शहरात होणे सध्या तरी अशक्य असून, प्रशासनाला माजगाव हाच पर्याय ठरणार आहे. \शासकीय जागाच उपलब्ध नाही : बी. बी. जाधव४भाईसाहेब सावंत यांचे स्मारक सावंतवाडी शहरात करण्याबाबत तहसीलदार बी. बी. जाधव म्हणाले, आम्ही सर्व ठिकाणी जागेची चाचपणी केली. ४पण अद्याप शासकीय जागाच मिळाली नसून अनेक जागांची पाहणी केली आहे.४मात्र, त्या जागांवर देवराई व स्मशानभूमीची आरक्षणे असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.