शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत राजकारणी तर आहेतच, आता चांगले खेळाडू घडतील; नारायण राणेंची मिश्किल टिपणी 

By सुधीर राणे | Updated: March 18, 2023 16:19 IST

कणकवली: कणकवली शहरातील नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जी आश्वासने गेल्या पाच वर्षांपूर्वी आम्ही दिली होती, ...

कणकवली: कणकवली शहरातील नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जी आश्वासने गेल्या पाच वर्षांपूर्वी आम्ही दिली होती, ती पूर्ण केली आहेत. शहरातील रस्ते आणि विकासकामे गतीने सुरु आहेत. शहरातील खेळाडूंसाठी स्पोर्ट कॉम्प्लेक्स हे एक दालन उभारण्यात आले आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळाडू सराव करतील असे सांगतानाच कणकवलीत अनेक राजकारणी तर आहेतच, पण आता चांगले खेळाडूही घडतील अशी मिश्किल टिपणी केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली.कणकवलीच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्सचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हस्ते आज, शनिवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, अबिद नाईक, रवींद्र गायकवाड, ऍड.विराज भोसले, नगरसेविका मेघा गांगण, उर्वी जाधव, मेघा सावंत, कविता राणे,  मुख्याधिकारी अवधूत तावडे, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्री राणे म्हणाले, शहरात रस्ते आणि चांगल्या नागरी सुविधा आम्ही देत आहोत. नागरिकांचेही चांगले सहकार्य लाभत आहे. कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांचे काम कौतकास्पद आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समुळे शहरातील तरुणांना बॅडमिंटन, कबड्डी असे इनडोअर गेम खेळण्यासाठी  हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धा होण्याच्या दृष्टीने हे स्पोर्ट कॉम्प्लेक्स तयार केले आहे. तर कणकवलीच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने बारमाही वाहणारा धबधबा जानवली नदीवरील गणपती साना या ठिकाणी केला जाणार असल्याचा आनंद असल्याचेही मंत्री राणे यावेळी म्हणाले. तसेच पुढील पाच वर्षे नगरपंचायतीत सत्ता द्या शहराचा उर्वरित विकासही करू असेही ते म्हणाले.राणे बंधूंकडून बॅडमिंटनचे प्रदर्शन!भाजपाचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे आणि त्यांचे बंधू आमदार नितेश राणे यांनी या नूतन स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या लोकार्पण सोहळ्यानंतर बॅडमिंटन खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांच्या खेळाला चांगली दाद दिली.मंत्री नारायण राणे यांनीही बॅडमिंटनचा आनंद लुटला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे