शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

..तर संबंधितांवर कारवाई करणार

By admin | Updated: June 8, 2016 00:10 IST

शेखर सिंह : जिल्हा परिषद स्थायी समिती सभा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुुदुर्गातील रस्त्यांचा दर्जा दरवर्षी खालावत जात असल्याने रस्ते खराब होत आहेत. पावसात तर रस्त्यांचे डांबर जावून त्याचे डबके तयार होत आहे. संबंधित ठेकेदाराने निविदा प्रक्रियानुसार डांबर, खडी, रवाळी यांचे योग्य प्रमाण नसल्याने रस्त्याची क्वॉलिटी टिकत नसल्याचा आरोप सदस्य सतीश सावंत यांनी करत निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कोणती कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला. निकृष्ट व नादुरुस्त रस्त्यांची शासनाच्या क्वॉलिटी कंट्रोलमार्फत तपासणी करण्यात येणार असून त्यात दोष आढळला तर संबंधित शाखा अभियंता व उपअभियंता यांच्यावर कारवाई होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषद स्थायी समितीची मासिक सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, विषय समिती सभापती दिलीप रावराणे, आत्माराम पालेकर, रत्नप्रभा वळंजू, अंकुश जाधव, समिती सदस्य सतीश सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, रणजित देसाई, प्रमोद कामत, रेवती राणे, वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, समिती सचिव तसेच पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल बागल, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सिंधुदुर्गातील १७ प्राथमिक व ८ उच्च प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीच्या बांधकामासाठी शासनाकडून ५१ लाख ६२ हजार रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानाच्या समन्वयक स्मिता नलावडे यांनी दिली. या शाळांची प्राधान्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे.डोहातला गाळ महामार्गासाठी वापरागावातील नदी व ओहोळामधील डोहात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पाण्याचे स्त्रोत मंद झाले आहेत. पुढील वर्षी हा सर्व गाळ काढून तो महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भरावासाठी वापरावा अशी सूचना सदस्य रणजित देसाई यांनी केली. याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फोंडा येथे शौचालय व गोठ्यांच्या बांधकामे करण्यात आली. मात्र २०१ शौचालय लाभार्थ्यांपैकी केवळ २५ जणांनाच लाभ देण्यात आला आहे. तर १७६ लाभार्थी वंचित राहिले आहेत. तर गोठ्यांचे लाभार्थीही अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना तत्काळ अनुदान वर्ग करा अशा सूचना सदस्य मधुसूदन बांदिवडेकर यांनी केल्या. संबंधित लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात येईल असे कमलाकर रणदिवे व डॉ. अनिल बागल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)