शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
3
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
4
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
5
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
6
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
7
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
8
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
9
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
10
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
12
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
13
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
14
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
15
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
16
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
17
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
18
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
19
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
20
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Daily Top 2Weekly Top 5

...तर सी-वर्ल्ड प्रकल्प अन्यत्र

By admin | Updated: May 20, 2016 22:45 IST

प्रमोद जठार : सिंधुदुर्गातील पयार्यी जागांचा विचार होणार

मालवण : मालवण तालुक्यातील वायंगणी-तोंडवळी येथील प्रस्तावित जागतिक दर्जाच्या सी-वर्ल्डबाबत स्थानिक आजही अनुकूल नाहीत. आंतराष्ट्रीय दर्जाच्या असलेल्या प्रकल्पाला स्थानिक भूमिपुत्र विरोध करत असल्यामुळे सी-वर्ल्ड अन्यत्र साकारण्याबाबत चाचपणी सुरु केली आहे. पर्यटन क्रांतीत सी-वर्ल्ड हा ‘मैलाचा दगड’ ठरणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच किमान ३०० ते ४०० एकर जागा उपलब्ध झाल्यास त्याठिकाणी सी-वर्ल्ड साकारला जाईल, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. मालवण येथे शासकीय विश्रामगृह येथे आयोजित भाजपा तालुका कार्यकारिणीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, मच्छिमार सेल जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर, विलास हडकर, भाऊ सामंत, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज पेडणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. जठार म्हणाले, सी-वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार आहे. मात्र त्यासाठी वायंगणी तोंडवळी ग्रामस्थांचा विरोध असेल तर तो अन्यत्र हलविला जाईल. मालवणातील पर्यायी जागांचा तसेच सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील प्रकल्पास अनुकूल अशा जागेचा विचार करून त्याठिकाणी भूमिपुत्रांना सोबत घेवूनच सी-वर्ल्ड केला जाईल. विरोधक आपल्यावर पोपटपंची करत असल्याचे आरोप करतात हे त्यांचे काम आहे. मात्र मी केवळ पोपटपंची न करता विकासकामे करून दाखवतो, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपला विकास करण्यात रस आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्याप्रमाणे ग्रामीण भागात भाजपाच्या माध्यमातून विकास साधायचा आहे, असेही जठार म्हणाले.इच्छुक उमेदवारांसाठी खुले आवाहनमालवण पालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ज्या इच्छुकांना भाजपकडून निवडणूक लढवायची आहे. त्यांनी थेट जिल्हाध्यक्ष या नात्याने आपल्याशी संपर्क साधावा. प्रामाणिक तसेच जनसंपर्क असलेल्या इच्छुकांना निश्चितच उमेदवारी दिली जाईल. सत्तेच्या माध्यमातून पालिका क्षेत्र व गावाचा विकास करताना या उमेदवारांना बळ दिले जाईल, असेही जठार यांनी सांगितले. त्यामुळे इच्छुकांनी संपर्क साण्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)शतप्रतिशत भाजपा हेच धोरणसिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी काळात नगरपंचायत, नगरपालिका तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत युतीबाबत निर्णय घेतलेला नाही. निवडणुका डोळ्यासमोरून ठेवून निवडणूकपूर्व तयारी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आम्ही केवळ पक्षवाढीच्या धोरणाचा विचार करता ध्येयधोरणे राबवणार आहोत. त्यामुळे याचा परिणाम निवडणूक निकालावर काय होतो, विरोधी पक्षांना कसा फायदा होतो याचा विचार न करता केवळ ‘शतप्रतिशत भाजपा’हेच धोरण अवलंबले जाणार आहे, असेही जठार यांनी सांगितले.