शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून महिला जागीच ठार, दोघे जखमी; सावंतवाडीतील घटना

By अनंत खं.जाधव | Updated: February 14, 2024 17:59 IST

पती समोर पत्नीचा मृत्यू

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदाना समोर निवासी संकुलाचे काम सुरू असून या कामासाठी स्वार हाॅस्पीटलच्या बाजूच्या संरक्षक भिंतीची माती काढत असताना अचानक तिघांवर मातीचा ढिगारा कोसळला. यात ढिगाऱ्याखाली अडकून एक महिला जागीच ठार झाली. तर दोघांना वाचविण्यात यश आले. शारूबाई गोविंद राठोड (वय ३२ मूळ रा.विजापूर कर्नाटक सध्या. सावंतवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना आज, बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. जखमींना येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची ही प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयाकडून सांगण्यात आले. गोविंद राठोड (३६), चांदुबाई दीपक जाधव (३३) अशी जखमींची नावे आहेत.सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदाना समोर एका निवासी संकुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी स्वार हॉस्पीटलच्या बाजूच्या भितीची असलेली माती काढण्यात येत होती. त्याच वेळी तिथे काही कामगार काम करत होते. दरम्यान, बाजूच्या भितीचा ढिगारा कोसळून शारूबाई राठोड, गोविंद राठोड, चांदुबाई जाधव या ढिगाऱ्याखाली अडकल्या.याघटनेनंतर कामगारांनी धावाधाव करून नागरिकांना बोलवले तसेच पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने ढिगारा बाजूला करण्यात आला. यात शारूबाई यांचा जागीच मृत्यू झाला. तर गोविंद राठोड व चादूबाई जाधव या दोघांनी आपला जीव कसाबसा वाचवला. किरकोळ जखमी झाल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अचानक घडलेल्या दुर्घटनेनंतर महिलांनी तर एकच टाहो फोडला. शारूबाई ही पतीसह या इमारतीच्या कामाला होती. तिली दोन मुली आहेत.पती समोर पत्नीचा मृत्यूमातीचा ढिगारा खाली आला तेव्हा तिघे तेथे काम करीत होते. यात मृत शारूबाई सोबत पती गोविंद हा ही होता. पण त्याने पत्नीला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. अन् पत्नीचा डोळ्यासमोर मृत्यू झाला. तो ही यात जखमी झाला असून त्याला येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग