शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: अख्खं गाव रामेश्वराच्या स्वाधीन!; आचरे गावच्या गावपळण प्रथेचा प्रारंभ, जाणून घ्या अख्यायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:05 IST

कडाक्याची थंडी तरीही गावकऱ्यांचा अभूतपूर्व उत्साह

सिद्धेश आचरेकरआचरा : मालवण तालुक्यातील आचरा गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा हुकूम अंतिम मानत आचरेवासीयानी रविवारी दुपारनंतर शेकडो वर्षांची परंपरा जोपासताना गावपळणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गाव खाली केले. गावकऱ्यांनी आचरा गावच्या चारही बाजूंच्या सीमेलगत संसार थाटले. तब्बल पाच वर्षांनी गावपळणीचा कौल श्री देव रामेश्वराने दिल्याने  ग्रामस्थ गावपळणीच्या प्रथेचा मनमुराद आनंद लुटू लागले आहेत. जणू अख्खं गाव तीन दिवस तीन रात्री करीता रामेश्वराच्या स्वाधीन केले आहे. 

गौरवशाली परंपरा असलेल्या ऐतिहासिक गावपळण प्रथेचा रविवारी प्रारंभ झाला. ग्रामस्थांनी आपापली घरे बंद करून पाळीव प्राणी, गुरेढोरे, मांजर, कोंबडी, पोपट, कुत्रे आणि कुटुंबासह सीमेबाहेर संसार थाटले. बघता बघता सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेला आचरे गाव पुर्णतः निर्मनुष्य झाला. मुणगे करिवणे नदीकिनारी, चिंदर माळरान येथे उभारलेल्या झोपड्यामध्ये ग्रामस्थ आणि आबालवृद्ध मंडळी विसावली आहेत. १८ रोजी गाव नाही भरला तर अंगारकी संकष्टी झोपड्यामध्ये साजरी केली जाणार आहे. आचरा पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरासह पाच स्थळांना गाऱ्हाणे केले. रामेश्वराच्या नगारखान्यातील नौबत दणाणल्यानंतर तोफांचा आवाज अन् बंदुकीच्या फैरी होताच दोन्ही दिंडी दरवाजे बंद करण्यात आले. रामेश्वराचे मुख्य प्रवेशद्वार बारापाच मानकऱ्यांनी बंद केले. मंदिरातील धार्मिक विधी आटोपल्यानंतर सारे गाव तासाभरात निर्मनुष्य झाले. तीन दिवस तीन रात्री कडाक्याची थंडीतही शेकोटीची ऊब घेत गाण्यांच्या भेंड्या बरोबर गप्पांचे फड तसेच अनेकविध मनोरंजनाचे कार्यक्रम रंगणार आहेत. सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या आचरे गाव निसर्गाच्या सानिध्यात सर्व जातीधर्माच्या लोकांसमवेत झोपड्यामध्ये नांदत आहेत. 

विज्ञानाचा श्रद्धेची सांगड !गावपळणीमुळे ग्रामस्थांमध्ये एक नवा उत्साह, नवी शक्ती संचारते. संपूर्ण गाव तीन दिवस मोकळा राहिल्याने गावात होणारे प्रदूषण, विविध प्रकारचे उद्धभवणारे रोगराई आटोक्यात येते. नैसर्गिक दृष्ट्या गाव पुर्णतः शुद्ध होतो. तीन दिवसांनी नवा जोश घेवून प्रत्येक ग्रामस्थ आपल्या हक्काच्या घरट्यात परततो. अशीही विज्ञानाला श्रद्धेची सांगड घालून ग्रामस्थ शेकडो वर्षांची प्रथा मोठ्या उत्साहात जोपसत आहेत. 

अशी आहे अख्यायिका!पूर्वीच्या काळी आचरे गाव सुखाने नांदत नव्हता, सुखवस्ती होत नव्हती. त्यावेळी मानकऱ्यांनी श्री देव रामेश्वराकडे कौल मागितला आता गावात असणाऱ्या अदृश्य, पाशवी शक्तींना तीन दिवस तीन रात्री गाव मोकळा सोडल्यास गाव सुखवस्तू होईल, असे वचन दिले. त्याप्रमाणे देवाने दिलेल्या वचनाचा आदर करत शेकडो वर्षांचा उभा असलेला संसार,  जमीनजुमला सोडून ग्रामस्थ सीमेपलीकडे निसर्गाच्या सानिध्यात गुण्या गोविंदाने राहतात. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग