शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सावंतवाडीत आलेल्या आनंदाच्या शिध्यातील साखरेत घोळ, माजी नगरसेवकांकडून पुराव्यासह उघड

By अनंत खं.जाधव | Updated: March 24, 2023 18:03 IST

सावंतवाडी : शासनाकडून सावंतवाडी तालुक्यासाठी पाठविण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्यातील साखरेत एक-दोन नव्हे, तर तब्बल एक टनाचा घोळ झाला आहे. ...

सावंतवाडी : शासनाकडून सावंतवाडी तालुक्यासाठी पाठविण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्यातील साखरेत एक-दोन नव्हे, तर तब्बल एक टनाचा घोळ झाला आहे. माजी नगरसेवकांकडून हा घोळ उघड करण्यात आला.

साखरेचा ट्रक पुन्हा माघारी पाठवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. सुरेश भोगटे यांच्यासह उमाकांत वारंग व विलास जाधव यांनी तहसीलदार अरुण उंडे यांची भेट घेत पुराव्यासह हा प्रकार निर्दशनास आणून दिला.मंगळवार दि. २१ मार्चला सकाळी आनंदाच्या शिद्यातील २५ टन साखरेची पॅकेट असलेला ट्रक सावंतवाडी गोदामात दाखल झाला. यावेळी त्याची मोजणी केली असता प्रत्येक पॅकेटमध्ये किलोमागे २०० ते ३०० ग्रॅमची तूट मिळाली. त्यामुळे तेथील पुरवठा व्यवस्थापकांनी तो ट्रक साखर न स्वीकारता माघारी पाठवला. दरम्यान या ठिकाणी आलेला ट्रक एकाएकी माघारी का गेला? अशी शहरात चर्चा रंगली होती.यावेळी माजी नगरसेवकांकडून याबाबत पाठपुरावा करण्यात आला. तसेच यासंदर्भात छुप्या पद्धतीने माहिती घेण्यात आली असता साखरेत घोटाळा असल्याचे उघड झाले. त्यानुसार दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हा पुरवठा विभागाकडे केली.तर या संदर्भात आज तहसीलदारांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधत योग्य ती पावले उचलली जावीत, आणि धान्य पुरवठा विभागात अन्य मार्गानेही असा घोटाळा होतो का? याची तपासणी करावी, अशी मागणी केली. यापूर्वी ही अनेक वेळा अशाच तक्रारी करण्यात आल्या आहेत. तहसिलदार म्हणून आपण धान्याची तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग