शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विहीरीमध्ये पडलेल्या गव्याच्या पिल्लास वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथकाने दिले जीवदान, सिंधुदुर्गातील तेंडोली येथील घटना

By सुधीर राणे | Updated: December 22, 2022 17:29 IST

विहिरीतून बाहेर निघताच पिल्लाने नैसर्गिक अधिवासात धूम ठोकली.  ​​​​​​​

कुडाळ: तेंडोली तळेवाडी येथील शांताराम अण्णा तेली यांच्या कठडा नसलेल्या शेत विहीरीमध्ये आज, गुरूवारी सकाळच्या सुमारास गव्याचे पिल्लू पडल्याचे निदर्शनास आले. याबाबत माजी सरपंच मंगेश प्रभू यांनी वनपाल नेरूर हवेली धुळु कोळेकर यांना दिली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र कुडाळचे रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्या पिल्लास सुखरूख बाहेर काढले.विहिर परिसरात माड व काजूबागायती क्षेत्र असलेने घटनास्थळी जेसीबी मशीन अथवा क्रेन घेऊन जाणे अशक्य होते. वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी दाखल झाले. नंतर १५-२०  फूट खोल विहिरीमध्ये वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट यांनी शिडी व दोर याच्या साहाय्याने उतरून त्या पिल्लाच्या अंगाभोवती पट्टा गुंडाळल्यानंतर त्यास दोरीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले. बाहेर निघताच पिल्लाने नैसर्गिक अधिवासात धूम ठोकली. उपवनसंरक्षक सावंतवाडी एस एन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) वनविभाग सावंतवाडी व कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे, वनपाल नेरूर धुळु कोळेकर वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, वनपाल मठ सावळा कांबळे, वनरक्षक कुडाळ संजीव जाधव, वनमजूर कदम, वाईल्ड लाईफ रेस्क्यू इमर्जन्सी संस्थेचे अनिल गावडे, वैभव अमृस्कर, सिद्धेश ठाकूर, स्थानिक ग्रामस्थ नितीन वेंगुर्लेकर, अण्णा तेली, आबा भोगले व पोलीस पाटील तेंडोली नाईक यांनी यशस्वी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग